इंटरनेटचे मायाजाल (डॉ. सुनील व अश्‍विनी गोडबोले)

इंटरनेटचे मायाजाल (डॉ. सुनील व अश्‍विनी गोडबोले)

आरोग्यमंत्र
‘व्यसन’ हे मोठ्यांना असते, असा समज एकेकाळी होता. व्यसन म्हणजे दारू, सिगारेट, तंबाखूच्या आहारी जाणे, असे समजले जायचे. गेल्या दोन दशकांतील संगणक युगाच्या क्रांतीपासून व्यसनांचे नवीन प्रकार सुरू झाले. पाश्‍चात्त्य देशांना याचा फटका आधी बसला. किंबर्ले यंग या संशोधिकेने १९९६ मध्ये सर्वप्रथम ‘इंटरनेट ॲडिक्‍शन डिसॉर्डर’ हा गंभीर आजार असल्याचे पुराव्यानिशी शाबीत केले. त्यापाठोपाठ चीन, दक्षिण कोरियामध्येही याचे गंभीर स्वरूप लक्षात आले. गेमिंग, पोर्न व्हिडिओ यांचे गांभीर्य लक्षात येऊ लागले. मुलांमध्ये या व्यसनाची सुरवात कार्टूनपासून होते. त्यानंतर, सर्फिंग, फेसबुक, इन्स्टाग्राम असे टप्पे घेत चॅटिंग सुरू होते. त्यापाठोपाठ गेमिंगला सुरवात होते. सुरवातीला केवळ टाइमपास म्हणून किंवा उत्सुकता म्हणून इंटरनेट वापरले जाते. पण, नंतर इंटरनेट वापरण्याचा वेळ वाढतो. ते बंद केल्यावरही परत कधी ‘लॉग इन’ हाच विचार डोक्‍यात सुरू असतो. अशा वेळेस इंटरनेटचा वापर कमी करण्याचे प्रयत्नही फोल ठरतात. कितीही वेळ सर्फिंग केले, अनेक गेम्स खेळले तरीही समाधान होत नाही. आनंदही मिळेनासा होतो.

झोपेची वाट लागते, भूक लागेनाशी होते. शाळा-अभ्यास-खेळ-गप्पाटप्पा-मित्र-मैत्रिणी हे सगळेच टाळावेसे वाटते. मित्र तुटतात किंवा इंटरनेटचे व्यसन असणारेच मित्र राहतात. वागण्या-बोलण्यात तुटकपणा, चिडकेपणा येतो. पुढच्या टप्प्यात नैराश्‍य येते. अपराधीपणाही वाटू लागतो. हे व्यसन लपविण्यासाठी सहज खोटे बोलणेही सुरू होते. अभ्यासात मागे पडणे, नापास होणे हे तर स्वाभाविकच! ही सगळी लक्षणे एकत्रित दिसणे म्हणजेच ‘इंटरनेट ॲडिक्‍शन डिसॉर्डर’! अमेरिकेतील सिएटलच्या डॉ. ख्रिस्ताकी आणि डॉ. मोरेनो या संशोधकांनी या गंभीर आजाराला एकविसाव्या शतकातील येऊ घातलेली सगळ्यात मोठी आणि भयानक साथ म्हटलेय. त्यांच्याच शब्दांत, ‘‘एखाद्या चुंबकाप्रमाणे आपली मुलं इंटरनेटच्या जाळ्यात खेचली जात आहेत. हे आपण मोठ्यांना कळतेय; पण तरीही काही करू शकत नाही, अशी हतबलता आहे.’’

(उद्याच्या अंकात : मुलांना इंटरनेटचे व्यसन लागण्यापूर्वी पालकांनी कोणते सोपे नियम अमलात आणावेत?) 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com