Sunil Dutt : अष्टपैलू अभिनेता ते राजकारणी

Sunil Dutt
Sunil Dutt

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयासह सुनील दत्त यांनी निर्मिती, दिग्दर्शन तसेच राजकारणातही ठसा उमटवला. विविध भूमिका समर्थपणे करताना त्यांनी समाजकारणातही मोलाचे योगदान दिले. 90 व्या जयंतीनिमित्त दत्त यांच्या बहुरंगी कारकिर्दीची सफर... 

कारकीर्द :
सुनील दत्त यांचे मूळ नाव बलराज दत्त. वयाच्या पाचव्या वर्षी पितृछत्र हरविल्यानंतर 18 व्या वर्षी फाळणीचे चटकेही त्यांनी सहन केले. पाकिस्तानातून सुरवातीला हरियाना, लखनौनंतर ते मुंबईत आले. मुंबईतील जयहिंद महाविद्यालयातून पदवी संपादन केली. आकाशवाणीवरून कारकिर्दीची सुरवात, उर्दूवरील प्रभुत्वामुळे रेडिओ सिलोनच्या हिंदी वाहिनीवर प्रचंड लोकप्रिय झाले. त्यानंतर, 1955 मध्ये "रेल्वे प्लॅटफॉर्म' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश. 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या "मदर इंडिया'ने स्टारडम मिळवून दिले. दत्त यांनी 1950 आणि 60 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य केले. 

प्रमुख चित्रपट :
मदर इंडिया 
साधना 
मुझे जीने दो 
खानदान 
पडोसन 
वक्त 
हमराज 
जानी दुश्‍मन 

राजकीय भूमिका साकारताना :
1984 मध्ये कॉंग्रेसमध्ये प्रवेश. वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवड. 
तत्कालीन मनमोहन सिंग सरकारमध्ये (2004 - 2005) युवा कल्याण आणि क्रीडा खात्याचे मंत्री 

समाजकारणातही योगदान :
पत्नी नर्गिसचे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने निधन झाल्यावर दत्त यांनी कर्करोगाच्या रुग्णांसाठी "नर्गीस दत्त फाउंडेशन'ची स्थापना केली. फाउंडेशनच्या माध्यमातून कर्करोग रुग्णांवर उपचार केले जातात. मुलांच्या चेहऱ्यावरील विकृती दूर करून उपचार करणाऱ्या "इंडिया प्रोजेक्‍ट'चे प्रायोजकत्वही त्यांनी स्वीकारले होते. 

वारसा :
संजय दत्त (अभिनेता), प्रिया दत्त (माजी खासदार), नम्रता दत्त 

पुरस्कार :
पद्‌मश्री (1968) 
राजीव गांधी राष्ट्रीय सद्‌भावना पुरस्कार 
फिल्मफेअर पुरस्कार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com