व्यायाम करणे टाळत नाही (आशा भट)

व्यायाम करणे टाळत नाही (आशा भट)

स्लिम फिट
मी  मूळची कर्नाटकची. माझे शालेय शिक्षण तेथेच झाले. शाळा-महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मी एका सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला आणि चित्रपटसृष्टीची दारे माझ्यासाठी खुली झाली. माझा ‘जंगली’ हा पहिलाच हिंदी चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या नावावरून यामध्ये ॲक्‍शन आणि ॲडव्हेंचर असणार, यात शंका नाही. या क्षेत्रात फिटनेस खूपच महत्त्वाचा झाला आहे. स्लिम आणि ट्रीम होण्यासाठी सगळेच प्रयत्न करतात आणि आजची एकूणच जीवनशैली पाहता ते आवश्‍यक झाले आहे. त्यामुळे आता मीसुद्धा फिटनेसवर अधिक लक्ष देते. मी दिवसभरातून दोन तास व्यायाम करण्याचा प्रयत्न करते. मी संध्याकाळी व्यायाम करते, मात्र रात्रीचे शूटिंग असल्यास सकाळी लवकर उठून व्यायाम करते. फिट राहण्यासाठी मी बॉक्‍सिंग, मार्शल आर्ट आणि फ्री हॅंड एक्‍सरसाइज करते. त्याचबरोबर आठवड्यातून तीन वेळा वेट ट्रेनिंग करते. पुशअप्स आणि पुलअप्स हे हॅंड एक्‍सरसाइज करते. 

दिवसभर न थकता काम करण्यासाठी स्टॅमिना लागतोच. स्टॅमिना वाढविण्यासाठी मी कार्डिओ आणि बॉक्‍सिंग करते. आताची युवा पिढी स्लिम होण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी सतत वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करतात, पण मी कोणताही डाएट किंवा पथ्य पाळत नाही. मी सगळ्या प्रकारचे अन्न खाते. मी खूप फुडी आहे. मला सतत खायला खूप आवडते. मी शाकाहारी असल्याने सगळ्या भाज्या आणि फळे खाते. पालेभाज्या किंवा एखादे कारलेसुद्धा मी आनंदाने खाते. दिवसातून सहा वेळा तरी मी खाते; पण त्यामध्ये थोड्या वेळेचे अंतर ठेवून खाते. त्यामुळे भरपूर खाल्ल्यानंतर व्यायाम करून खाल्लेले बर्न आउट करते. खाण्याचे टाइमटेबल मी बनविलेले नाही, कारण कधी-कधी कामाचा अधिक ताण असल्याने खाण्याच्या वेळा व्यवस्थित पाळता येत नाहीत. वडापाव, दाबेली, इडली-वडा असे सगळे पदार्थ मला खायला खूप आवडतात. वडापाव आणि इडली हे दोन्ही पदार्थ माझे सर्वांत आवडते आहेत व ते मी कितीही खाऊ शकते. गोड पदार्थांमध्ये मला सोनपापडी, मलई सॅंडविच आणि रसमलाई खायला खूप आवडते. भरपूर खाण्याबरोबरच पाणी पिणेही शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्वचा चांगली राहावी यासाठी मी खूप पाणी पिते. फिट राहण्यासाठी व्यायाम करणे आणि त्वचेला ताजेतवाने ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. व्यायाम मी कधीच टाळत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com