शैक्षणिक संधी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

वाटा शिक्षणाच्या - दत्तात्रेय आंबुलकर, एचआर व्यवस्थापन सल्लागार  
    महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातर्फे घेण्यात येणारी विद्युत पर्यवेक्षक व तारतंत्री परीक्षा - २०१९ 
    विद्युत पर्यवेक्षक परीक्षा - राज्य स्तरावरील विद्युत पर्यवेक्षक परीक्षा २३ नोव्हेंबर रोजी, तर तोंडी परीक्षा २४ नोव्हेंबरला मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर या परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल. - तारतंत्री परीक्षा - राज्य स्तरावरील विद्युत तारयंत्री परीक्षा २६ नोव्हेंबरला मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, नागपूर व अमरावती या परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल. 
अधिक माहिती व तपशील ः अर्जाचा नमुना व तपशिलासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या www.cei.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. 
    अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख - विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्‍यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज संबंधित जिल्ह्याच्या विद्युत निरीक्षक कार्यालयात सादर करण्याची शेवटची तारीख पर्यवेक्षक परीक्षेसाठी १९ ऑक्‍टोबर, तर तारयंत्री परीक्षेसाठी २२ ऑक्‍टोबर आहे. 
    महाराष्ट्र शासनाच्या भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र - कोल्हापूर येथे केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा २०२० साठी प्रशिक्षण - 
उपलब्ध जागांची संख्या व तपशील - प्रशिक्षणासाठी उपलब्ध जागांची संख्या ८० असून, यामध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या १० जागा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेद्वारा अनुदानित १० जागांचा समावेश आहे. 
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क - प्रशिक्षण योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी महाराष्ट्र शासनाच्या भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूरच्या www.pitckolhapur.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. 
अर्ज करण्याची शेवटची पद्धत व शेवटची तारीख - संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑक्‍टोबर आहे. 
    इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रोनियल टेक्‍नॉलॉजी, चंडीगड येथील संशोधनपर पीएचडी - 
आवश्‍यक शैक्षणिक पात्रता - अर्जदारांनी एमएससी, एमटेक, एमफार्म यांसारखी पात्रता कमीत कमी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी अथवा त्यांनी बीफार्म, बाई, एमबीबीएस पात्रता ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी जीएटीई - जेआरएफ फेलोशिप यांसारखी पात्रता परीक्षा दिलेली असावी. 
वयोमर्यादा - अर्जदारांचे वय २८ वर्षांहून अधिक नसावे. 
अधिक माहिती व तपशील - संशोधनपर पीएचडी योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रोबियल टेक्‍नॉलॉजी, चंदीगडच्या http://acsir.res.in अथवा

hd">http://www.imtech.res.in/phd या संकेतस्थळांना भेट द्यावी. 
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख - संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्‍टोबर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dattatrey aambulkar edu supplement sakal pune today