व्यवसायाचा संसाराला हातभार!

दीपा चव्हाण
बुधवार, 4 डिसेंबर 2019

प्रत्येक स्त्रीने जीवनात काही ना काही केलेच पाहिजे. नुसते ‘चूल व मूल’ न सांभाळता आपला छंद जोपासून संसारासाठी हातभार लावला पाहिजे, असे मला नेहमीच वाटत होते. त्यातूनच मी माझ्या इमिटेशन ज्वेलरीच्या छंदाचे व्यवसायात रूपांतर केले. पारंपरिक व फॅन्सी दागिने मी घरच्या घरी बनवू लागले. नंतर त्याची विक्री सुरू केली. प्रत्येक वेळी नवनवीन डिझाइन; तसेच विविध बिड्सच्या डिझाइन करून विकत असल्याने चांगला प्रतिसाद मिळत गेला.

घरच्या घरी - दीपा चव्हाण
प्रत्येक स्त्रीने जीवनात काही ना काही केलेच पाहिजे. नुसते ‘चूल व मूल’ न सांभाळता आपला छंद जोपासून संसारासाठी हातभार लावला पाहिजे, असे मला नेहमीच वाटत होते. त्यातूनच मी माझ्या इमिटेशन ज्वेलरीच्या छंदाचे व्यवसायात रूपांतर केले. पारंपरिक व फॅन्सी दागिने मी घरच्या घरी बनवू लागले. नंतर त्याची विक्री सुरू केली. प्रत्येक वेळी नवनवीन डिझाइन; तसेच विविध बिड्सच्या डिझाइन करून विकत असल्याने चांगला प्रतिसाद मिळत गेला. माझ्या ज्वेलरीचे धुळे, नंदुरबार व पुण्यात प्रदर्शने लवायला सुरुवात केली. ज्वेलरीसोबतच मी नऊवारी साड्याही शिवून देऊ लागले. त्यानंतर साड्यांच्याही खूप ऑर्डर मिळू लागल्या. मी मागील दोन वर्षांपासून ज्वेलरी व नऊवारी साड्या जर्मनीत पाठवत आहे. या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने माझा आत्मविश्‍वास वाढत आहे. ग्राहकांचे समाधान होते, हेच माझे यश आहे. 

मला स्वतःला विविध स्थळांना भेटी देणे आवडत असल्याने मी सहली नेण्याच्या व्यवसायालाही सुरुवात केली. आतापर्यंत मी शेगाव, गोवा, केरळ, काश्‍मीर आदी सहली केल्या आहेत. या एकत्र आलेल्या महिलांसाठी मी बचत गट सुरू केला आहे. या कामासाठी मला माझ्या कुटुंबीयांकडून प्रोत्साहन मिळत गेले. सर्व महिलांनी आपल्या छंदातून घरच्या घरी काही ना काही व्यवसाय सुरू  करून आपल्या संसाराला हातभार लावल्यास समाधान मिळते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article deepa chavan on business