गजकर्ण प्रतिबंधासाठी काय करावे?

ringworm
ringworm

आरोग्यमंत्र - डॉ. धनश्री भिडे, त्वचारोग तज्ज्ञ 
गजकर्ण, सुरमा व इतर बुरशीजन्य आजार त्वचेतील व कपड्यातील दमटपणामुळे, प्रतिकारशक्ती कमी करणाऱ्या औषधांमुळे, वेगवेगळ्या कारणाने त्वचेतील वरच्या आवरणामध्ये छेद झाल्याने होतात. स्थूलपणा, मधुमेहासारखे आजार असलेल्या व्यक्तींमध्ये त्वचारोग जास्त प्रमाणात आढळतात. ओलसरपणा, तेलकटपणा हा बुरशीच्या वाढीस पोषक असतो. त्यामुळे आपल्याला पाळता येतील अशा गोष्टींकडे आपण काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवे. 

सैलसर व सुती कपडे परिधान करावेत : आपल्या देशातील व प्रांतातील हवामानाला अनुसरून पेहराव करावा. जीन्स पॅंटचे कापड जाड असल्याने ते पटकन वाळत नाही. तसेच, तरुण वर्गात ही पॅंट आठवड्यातून एकदाच धुण्याची ‘फॅशन’ आहे. शरीराबाहेर कपड्यांवर हे जंतू काही आठवडे जगतात. आपण कितीही औषधे घेतली तरी आपल्याच कपड्यातून ते परत त्वचेत

प्रवेश करतात. त्यामुळे वापरलेले कपडे, टॉवेल, पायमोजे हे रोजच्या रोज धुवावेत. अंतर्वस्त्रे गरम पाण्याने धुवावी. कपडे हवेवर वाळवावेत. बऱ्याच वेळा पावसाळ्यात कपडे ओलसर राहतात. अशा वेळेस त्यांचे अधिक जोड ठेवावेत. कपड्यावर गरम इस्त्री फिरवल्याने बुरशी मरते. घरातील ज्या व्यक्तींना गजकर्ण (रिंग वर्म) झाले आहे. अशा व्यक्तींचे कपडे मशीनमध्ये इतरांबरोबर मिसळू नयेत. ते वेगळे धुवावेत. प्रत्येक व्यक्तीचा साबण, टॉवेल, कंगवा वेगळा असावा. शरीरातील काखेसाख्या त्वचेची घामट जागा वाळवण्यासाठी पावसाळ्यात हेअर ड्रायर वापरता येईल. गजकर्ण झालेल्या रुग्णांनी पोहायला जाणे टाळावे. जिममध्ये जाणाऱ्यांनी स्वतःची मॅट स्वतःबरोबर ठेवावी. त्याचप्रमाणे, पाण्यात काम करणाऱ्यांनी काम झाल्यावर बोटांच्या मधील पाणी टिपून घ्यावे. त्यामुळे चिखल्या होणार नाहीत. बूट वापरणाऱ्यांनी बोटांच्यामधे टिश्‍यू पेपर ठेवावा. बूट हवेशीर जागेत ठेवावेत. पावसाळ्यात बूट आतून ओले राहतात. त्यासाठी ड्रायरच्या गरम हवेचा झोत आत मारावा. सुरम्याचा वारंवार त्रास होणाऱ्यांनी डोक्‍यातील कोंड्यावर उपचार घ्यावेत. कपड्याच्या आत सुती बनियन किंवा कॉटनची स्लीप वापरावी. सिंथेटिक कपडे वापरणे टाळावे. 

अशा प्रकारे काळजी घेतल्याने हा संसर्गजन्य आजार लवकर आटोक्‍यात आणण्यास मदत होईल. त्वचारोगाची लक्षणे आढळल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य उपचार घ्यावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com