वजनाशी यशस्वी लढा! : डॉ. जगन्नाथ दीक्षित

डॉ. जगन्नाथ दीक्षित
गुरुवार, 31 जानेवारी 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली! 
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

नाव : बाबाजी दिघे
वय : 40 वर्षे
उंची : 174 सेंमी
व्यवसाय : नोकरी

लष्करी पार्श्‍वभूमी असतानाही दीक्षित डाएटकडे वळण्याचे कारण काय?
- मी सैन्यातून 2014मध्ये निवृत्त झालो. माझे वजन झपाट्याने वाढत होते. भरपूर व्यायाम करूनही ते आटोक्‍यात येत नव्हते. त्यातच मधुमेहाची कौटुंबिक पार्श्‍वभूमी होती. त्यामुळे मी घाबरलो होतो. एकेदिवशी आमचे अधिकारी अरुण ओतारी यांनी माझी परिस्थिती पाहून मला या डाएट विषयी सांगितले. मी दोन दिवस यू-ट्यूबवर डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे व्हिडिओ पाहिले. त्यानुसार जीवनशैली अंगीकारण्यास सुरवात केली. त्यानंतर 21 ऑगस्ट 2018 रोजी रक्ततपासणी केली.

जीवनशैलीत काय बदल केला?
- डॉ. संतोष ढुमणे यांचे मार्गदर्शन लाभले. सुरवातीला आठवडाभर खूप भूक लागायची, पण नंतर सवय झाली. मी सकाळी 8 व रात्री 8 वाजता जेवतो. मध्ये फक्त पाणी पितो. सकाळी एक तास व संध्याकाळी दीड तास चालतो. इतर व्यायामही करतो. मी या नव्या जीवनशैलीचे तंतोतंत पालन केले. खूप चांगला फरक पडला. आल्हाददायक वाटत होतं. मात्र दोन महिन्यांनंतर मला आमवाताचा त्रास सुरू झाला. माझा डावा गुडघा व पायांची बोटे खूप सुजली. त्यानंतर इच्छा असूनही मी महिनाभर 50 मीटरदेखील चालू शकलो नाही. फक्त, जेवणाच्या नियमांचे पालन केले. त्यानंतर, तीन महिन्यांनी 29 नोव्हेंबर 2018 रोजी रक्ततपासणी केली. त्याचे अहवाल आश्‍चर्यचकित करणारे होते.

या अहवालाबद्दल...
माझे फास्टिंग इन्शुलिन 10.18 वरून 4.88पर्यंत खाली घसरले. त्याचप्रमाणे वजन 92 किलोवरून 84 किलोपर्यंत कमी झाले. कंबरेचा घेरही 105 सेंमी होता. तो 95 झाला. मी प्रीडायबेटिक नॉनडायबेटिक झालो होतो. मला आश्‍चर्य वाटले, कारण 30 दिवस मी व्यायाम करू शकलो नाही, तरीही इतका चांगला परिणाम मिळाला. डॉ. जगन्नाथ दीक्षित आणि यांच्या सहकाऱ्यांच्या भगीरथ प्रयत्नांना शतशः प्रणाम!

'सकाळ पुणे टुडे'मधील 'ऑल इज वेल', 'मैत्रीण' व 'EDU' या पुरवण्यांमधील लेख वाटण्यासाठी क्लिक करा -
पालकांनो, बालवाडी अभ्यासासाठी नसते!
आनंद देणाऱ्या गोष्टींतून व्यायाम करा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article by Dr Jagannath Dixit on diet and weight loss in All is Well supplement