मुलांमधील यकृताचे आजार टाळण्यासाठी...

Liver
Liver

आरोग्यमंत्र - डॉ. शीतल महाजनी-धडफळे, यकृततज्ज्ञ
आपण कालच्या लेखात लहान मुलांमधील यकृताच्या आजाराची माहिती घेतली. यातील आणखी घटक, कारणे आणि लहान मुलांमधील यकृतांचे आजार कसे टाळता येतील, हे पाहूयात.

लहान मुलांमध्ये हिपॅटायटिस ए, ई आणि बी यांबरोबरच व्हायरल हेपॅटायटिसही आढळतो. त्यामुळेच अन्नपाण्याची स्वच्छता राखणे आणि उघड्यावरील अन्नपदार्थांचे सेवन टाळणे आवश्‍यक असते. त्यामुळे ए, ई हेपॅटायटिस टाळता येऊ शकतो. तसेच ‘ए’ आणि ‘बी’ची लस सर्व बालकांना दिल्यास हा आजार टाळता येतो. आईवडिलांना ‘बी’ काविळीची लागण झालेली असल्यास त्यांच्या मुलांनाही लस देणे अत्यावश्‍यक आहे. गरोदरपणात आईवर योग्य औषधोपचार होणे आवश्‍यक आहे. 

ॲक्युट लिव्हर फेल्युअर : यकृत अचानक खराब झाल्यास जिवास धोका होतो आणि अशा वेळी यकृतरोपणामुळे जीव वाचू शकतो. 

यकृताचा कर्करोग - काही बालकांमध्ये यकृताचा जीवघेणा कर्करोग होतो, अशावेळी यकृतरोपणाची शस्त्रक्रिया हीच उपचारपद्धती लागू पडते. 

काही वेळेस यकृतातील रक्तवाहिन्यांमध्ये दोष झाल्यामुळे यकृताचा आजार उद्‍भवतो. या आजाराचे लवकर अचूक निदान झाल्यास यकृताचा मोठा आजार टाळता येतो. 

ही काळजी घ्या... 
१)    लहान मुलांना उघड्यावरचे कुपोषित अन्न देऊ नये. त्यांना देण्याचे येणारे पाणी सुरक्षित आहे, याची काळजी घ्यावी. 
२)    काही यकृताचे आजार आनुवंशिक असतात, त्यामुळे कुटुंबातील निकटच्या नातलगांना असे आजार असल्यास गर्भधारणेपूर्वी डॉक्‍टरकडे समुपदेशनासाठी जावे, तसेच गरोदरपणात नियमित चाचण्या कराव्यात. 
३)    आई-वडिलांना ‘हेप-बी’, ‘सी’ची बाधा असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य ती उपचारपद्धती अवलंबावी तसेच काळजी घ्यावी. 
४)    आपल्या पाल्यास wilson''s disease असल्यास अन्य मुलांचीही चाचणी करून घ्यावी. 
५)    नवजात शिशूंची विष्ठा पांढरट असल्यास डॉक्‍टरांचा त्वरित सल्ला घ्यावा. 
६)    काविळीची लक्षणे आढळल्यास, बाळाची भूक मंदावल्यास तज्ज्ञ डॉक्‍टरांकडे जाऊन योग्य त्या चाचण्या कराव्यात. 
७)    यकृतावर साइड इफेक्‍ट करणारी औषधे काही अन्य कारणांनी द्यावी लागल्यास डॉक्‍टरांकडे नियमित जाऊन योग्य चाचण्या कराव्यात. उदा. क्षयरोगाची औषधे. 
८)    बाळाची वाढ नीट होत नसल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. 
९)    हेपॅटायटीस ए व बीची लस उपलब्ध असून ती बालकांना द्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com