राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष

Edu
Edu

वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक
महाराष्ट्रातील विनाअनुदानित, खासगी व्यावसायिक, शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाचे व शुल्काचे नियमन करण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित बाबींसाठी २०१५चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २८ कायदा आहे. या मधील तरतुदींनुसार महाराष्ट्र सरकारने प्रवेश नियामक प्राधिकरण अंतर्गत स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल (सीईटी सेल) म्हणजेच राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाची स्थापना केली आहे.

देशभरातील जेईई, नीटसह अनेक परीक्षा एकाच छत्राखाली पारदर्शी, कार्यक्षम, स्वच्छ पद्धतीने राबविण्यासाठी देशपातळीवर ‘एनटीए’ - नॅशनल टेस्टींग एजन्सीच्या पद्धतीने राज्यातील सर्व शाखांच्या परीक्षा एकाच छत्राखाली घेण्यासाठी सीईटी सेलची स्थापना करण्यात आली. 

यंदा बारावीमध्ये शिकत असलेल्या म्हणजे पुढील वर्षी २०२०मध्ये बारावी व अनेक वेगवेगळ्या शाखांच्या सीईटी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नियामक प्राधिकरण व सीईटी सेलबाबत माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सीईटी सेलच्या www.mahacet.org या संकेतस्थळावरून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या वैद्यकीय शिक्षण, तांत्रिक शिक्षण, कृषी, ललितकला, उच्च शिक्षण, आयुष अंतर्गत तसेच मत्स्य विभाग, दुग्धतंत्रज्ञान, पशुवैद्यकीय या सर्व शाखांच्या प्रवेश परीक्षा आणि संपूर्ण प्रवेश प्रक्रिया याबाबतचे नियंत्रण सीईटी सेलतर्फे केले जाते. 

प्रवेश नियामक प्राधिकरण
एआरए - अॅडमिशन रेग्युलेटींग अॅथॉरिटी ही विनाअनुदानित, खासगी, व्यावसायिक शैक्षणिक संस्थांचे विनियमन करण्यासाठी आणि सामाईक प्रवेश परीक्षा म्हणजेच सीईटी घेण्यासाठी गठित केलेले प्राधिकरण आहे. प्रवेशासाठीची पात्रता, प्रवेशाची पद्धत, नियमबाह्य प्रवेश रद्दबातल ठरवणे,  
सीईटी कक्षामार्फत सीईटीचे संचालन व संनियंत्रण करणे, प्रवेश प्रस्तावाची पडताळणी व मान्यता देणे, हितसंबंधित घटकांच्या तक्रारींचे निवारण करणे ही याची कार्ये आहेत.

सीईटी सेल : सीईटी सेलच्या प्रमुखपदी आयुक्त म्हणून नियुक्त केलेले अधिकारी प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली काम करतात. या आयुक्तास वैद्यकीय, तंत्र, कृषी, उच्च शिक्षण, ललितकला, एमएएफएसयू, आयुष इत्यादी क्षेत्रातील राज्य शासनाच्या सहसंचालकांच्या दर्जाचे अधिकारी साह्य करतात.

प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा म्हणजेच सीईटी आवश्यक ती गोपनीयता राखून, उचित रितीने आयोजित करण्याबाबतचे निर्णय घेणे, हा कक्ष परीक्षक, मूल्यमापक, नियामक यांची नियुक्ती करते. परीक्षांचे आयोजन, मूल्यमापन व निकालाची प्रक्रिया यासाठी आवश्यक ते सॉप्टवेअर विकसित करण्याच्या कामगिरीसाठी व्यक्तीची नियुक्ती करते. ऑनलाइन किंवा ऑफलाइन परीक्षा आयोजित करण्यासाठी आवश्यक त्या सेवा पुरवठादारांची नियुक्ती करते. विविध दस्ताऐवजांची छपाई करते.

प्रत्येक जागेवरील प्रवेश हा राज्याच्या आरक्षण धोरणास अधीन राहून, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे अनुसरण्यात आलेल्या सामाईक परीक्षेत संपादित केलेल्या गुणवत्तेच्या आधारे देण्यात येईल याचे काटेकोरपणे पालन करणे ही सीईटी सेलची कार्ये आहेत. विद्यार्थी, पालकांनी राज्यातील वेगवेगळ्या शाखांच्या प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षा व इतर माहितीसाठी सेलच्या संकेतस्थळाच्या संपर्कात राहावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com