एमबीबीएस, बीडीएस प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात

Career
Career

वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया, करिअर मार्गदर्शक
आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत असणाऱ्या राज्यातील शासकीय, खासगी महाविद्यालयांतील एमबीबीएस व बीडीएस शाखांची प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ‘एमबीबीएस’ शाखेच्या प्रवेशाची कट ऑफ डेट १२ सप्टेंबर व बीडीएस शाखेची १५ सप्टेंबर अशी आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे फक्त एमबीबीएस व बीडीएस शाखांसाठीची तिसरी फेरी, मॉप अप राउंड ४ सप्टेंबर रोजी जाहीर झाल्यानंतर प्रवेश घेण्याची अंतिम मुदत ८ सप्टेंबरपर्यंत होती. त्यानंतर नॉन जॉइनिंगमुळे व प्रवेश सोडल्यामुळे शिल्लक राहिलेल्या जागा वाटपासाठीचे वेळापत्रक www.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहे. 

एमबीबीएस खासगी महाविद्यालयांचे प्रवेश
       खासगी महाविद्यालयांतील ‘एमबीबीएस’ शाखेतील शिल्लक राहिलेल्या जागांचा तपशील राखीव प्रवर्गानुसार, तसेच या संस्थापातळीवरील फेरीसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी www.mahacet.org या संकेतस्थळावर ८ सप्टेंबर रोजी रात्री दहापर्यंत जाहीर झाली आहे.
       ज्यांनी ८ सप्टेंबरपर्यंत ‘एमबीबीएस’ शाखेत कोठेही प्रवेश घेतलेला नाही, अशा विद्यार्थ्यांचा पात्र विद्यार्थ्यांच्या यादीत समावेश असेल.
       पात्र असणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांनी वैयक्तिकरीत्या संस्थेत ९ ते १० सप्टेंबरला दुपारी तीनपर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. 
       आलेल्या अर्जांतून मेरिट लिस्ट व पहिली निवड यादी, तसेच प्रतीक्षा यादी संबंधित महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवर, तसेच संस्थेच्या संकेतस्थळावर १० सप्टेंबर रोजी सायंकाळी सहानंतर जाहीर होईल. 
       पहिल्या निवड यादीनुसार ११ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत प्रवेश घ्यावयाचे आहेत. त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जागा शिल्लक राहिल्यास त्यांची माहिती व दुसरी निवड यादी जाहीर होईल. त्यानुसार १२ सप्टेंबर २०१९ रोजी दुपारी तीनपर्यंत प्रवेश घ्यावयाचा आहे. 

‘बीडीएस’ खासगी महाविद्यालयांचे प्रवेश
 शिल्लक जागांचा तपशील व पात्र विद्यार्थ्यांची यादी  www.mahacet.org या संकेतस्थळावर ८ सप्टेंबर रोजी रात्री दहापर्यंत जाहीर झाली आहे.
       ज्यांनी ८ सप्टेंबरपर्यंत बीडीएस शाखेत कोठेही प्रवेश घेतलेला नाही, याच विद्यार्थ्यांचा पात्र विद्यार्थी यादीत समावेश असेल.
       अशांनी वैयक्तिकरीत्या संस्थेत ९ ते १२ सप्टेंबर दरम्यान संध्याकाळी पाचपर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. 
       १२ सप्टेंबर रोजी मेरिट लिस्ट व पहिली निवड यादी सायंकाळी सहा वाजता संस्थेच्या नोटीस बोर्डवर व त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर होईल.
       पहिल्या निवड यादीनुसार १३ ते १४ सप्टेंबरला दुपारी दोन वाजेपर्यंत प्रवेशाची मुदत आहे, त्यानंतरही जागा शिल्लक राहिल्यास त्यांची माहिती व दुसरी निवड यादी १४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता जाहीर होईल व त्यानुसार १५ सप्टेंबर रोजी दुपारी तीनपर्यंत प्रवेश घ्यावयाचा आहे.
       पात्र इच्छुक विद्यार्थी एकापेक्षा अनेक संस्थांमध्ये अर्ज करू शकतात. अर्जाचा नमुना, नोटीस क्रमांक ३० मध्ये दिलेला आहे. या फेरीतील ८५ टक्के जागांवरील प्रवेशावर शासनाचे नियंत्रण असते. शिल्लक राहिलेल्या जागा, आपले गुण व आर्थिक क्षमता यांचा विचार करून विद्यार्थी, पालकांनी आपल्या इच्छेनुसार योग्य त्या ठिकाणी अर्ज करावेत. खासगी महाविद्यालयातील ‘एनआरआय’ कोट्यातील शिल्लक जागांसाठी प्रवेश घेताना शैक्षणिक शुल्क पाहून आपली आर्थिक क्षमता तपासून निर्णय घ्यावा. 
       ‘एमबीबीएस’ प्रवेशासाठी प्रयत्न केल्यानंतर प्रवेश मिळाला नाही, तर असे विद्यार्थी ‘बीडीएस’साठी अर्ज करण्याची मुदत १२ सप्टेंबरपर्यंत असल्यामुळे बीडीएस प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.

शासकीय एमबीबीएस, बीडीएस प्रवेश
शासकीय ‘एमबीबीएस’ व ‘बीडीएस’ शाखेचा मॉप अप राउंड ८ सप्टेंबर रोजी पूर्ण झालेला असून ‘एमबीबीएस’ शाखेच्या नॉन जॉइनिंगमुळे जागा शिल्लक राहण्याची शक्यता खूपच कमी असते. परंतु ‘बीडीएस’ शाखेच्या जागा नॉन जॉइनिंग तसेच पूर्वीचा प्रवेश सोडल्यामुळे शिल्लक राहू शकतात. त्यासाठी नव्याने अर्ज किंवा पसंतीक्रम भरावा लागत नसून, पूर्वी एकदाच नोंदवलेल्या पसंतीक्रमातून शासनाकडून प्रवेशासाठीची शेवटची यादी जाहीर केली जाते, याबाबत तसेच अचानक बदलणाऱ्या नियम व वेळापत्रकासाठी संकेतस्थळाच्या संपर्कात राहावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com