बीएएमएस, बीएचएमएस वाढीव मॉप अप फेरी

Education
Education

वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक
आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत असणाऱ्या राज्यातील शासकीय, शासन अनुदानित व खासगी महाविद्यालयांतील बीएएमएस, बीएचएमएस व बीयूएमएस शाखेतील प्रवेशासाठी एक्सटेंन्डेड - वाढीव दुसरा मॉप अप राउंड व त्याचबरोबर त्यानंतर स्ट्रे व्हॅकेन्सी राऊंड साठीचे वेळापत्रक www.mahacet.org या संकेतस्थळावर जाहीर झालेले आहे.

सीईटी सेलतर्फे जुलैमध्ये एकदाच पसंतीक्रम भरून घेतल्यानंतर कॅप राउंड झाल्यानंतर पहिला व दुसरा मॉपअप राऊंड यापूर्वीच घेण्यात आला होता. त्यानंतर प्रवेशाची कट ऑफ डेट ३० सप्टेंबर पर्यंत होती. शासकीय व खासगी संस्थांमधील काही जागा रिक्त राहिल्यामुळे आयुषतर्फे सुधारित प्रवेशाची कट ऑफ डेट १५ ऑक्टोबरपर्यंत वाढविली असून त्यानुसार आता या फेऱ्यांचे नियोजन केलेले आहे. 

वाढीव मॉप अप राउंड -२
    हा राउंड फक्त शासकीय व शासन अनुदानित महाविद्यालयांतील जागांसाठीच आहे. 
    एकदाच भरलेल्या पसंतीक्रमाद्वारे यापूर्वी घेण्यात आलेल्या फेऱ्यानंतर शिल्लक जागा व त्यासाठीची सिलेक्शन यादी जाहीर झालेली आहे. 
    नव्याने प्रथमच प्रवेश मिळालेले किंवा बेटरमेंट झाली, अशा सर्वांसाठी ५ ते ९ ऑक्टोबर दरम्यान संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रवेश स्वीकारण्याची मुदत आहे. 
 
या फेरीसाठी पात्र कोण
    ज्यांना यापूर्वीच्या कोणत्याही फेरीमधून प्रवेश मिळालेला आहे, त्यांनी तो स्वीकारला असून रिटेन्शन फॉर्म भरला नाही, असे सर्वजण या फेरीसाठी पात्र आहेत. 
    ज्यांनी पसंतीक्रम भरला आहे, परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रवेश फेरीतून अथवा मॉप अप फेरी-१ व फेरी-२ मधून प्रवेश मिळालेला नाही, असे सर्वजण पात्र आहेत.

या फेरीसाठी अपात्र कोण?
    यापूर्वीच्या कॅप प्रवेश फेऱ्या अथवा मॉपअप-१ व २ मधून ज्यांना प्रवेश मिळाला, त्यांनी तो स्वीकारला नाही, असे सर्वजण अपात्र आहेत.  

    ज्यांना यापूर्वीच्या कोणत्याही फेरीतून प्रवेश मिळाला, त्यांनी तो स्वीकारला, त्यांना त्यांचे इच्छेनुसार आवडला, त्यामुळे तो प्रवेश कायमस्वरूपी फिक्स करण्यासाठी ज्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला असे सर्व विद्यार्थी अपात्र आहेत. 

    पूर्वीची कट ऑफ डेट ३० नोव्हेंबर वरून १५ ऑक्टोबर करण्यात आली, त्यानंतर ३० नोव्हेंबरपर्यंत शासकीय, शासन अनुदानित, खासगी महाविद्यालयांमध्ये कोणत्याही शाखेत ज्यांनी प्रवेश घेतलेले होते, त्यांना संबंधित प्रवेश समाधानकारक वाटत नसल्यास तो सोडण्याची संधी ३ ऑक्टोबर पर्यंत देण्यात आलेली होती. त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी कोणत्याही फेरीतून प्रवेश मिळाला, त्यांनी तो स्वीकारला, परंतु ३ ऑक्टोबरपूर्वी त्यांच्या इच्छेनुसार सोडला असे सर्व विद्यार्थी अपात्र आहेत.
बीएएमएस, बीएचएमएस प्रवेशासाठी यापूर्वी ३० सप्टेंबरपर्यंत कॅप राउंड व मॉप अप फेरी-१ व २ घेऊनही शेवटची फेरी समुपदेशन - कौन्सिलिंग पद्धतीने न घेतल्याने शासकीय महाविद्यालयातील ‘बीएएमएस’ अभ्यासक्रमाच्या प्रत्येकी २१ संस्थांमधील एकूण १०७ जागा नॉन जॉईनिंगमुळे शिल्लक राहिल्या. त्यामुळे फक्त शासकीय महाविद्यालयातील जागांसाठी वाढीव दुसरा मॉप अप राउंड ९ ऑक्टोबर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतरही शासकीय महाविद्यालयातील १०७ पैकी काही जागांवर नॉन जॉइनिंग हे होणारच आहे, तसेच रिक्त १०७ शासकीय जागांवर खासगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने खासगी ‘बीएएमएस’ जागाही रिक्त राहू शकतात. अशा शिल्लक राहिलेल्या शासकीय, शासन अनुदानित, खासगी महाविद्यालयांतील जागांवरील प्रवेशासाठी स्ट्रे व्हॅकेन्सी राउंडची प्रवेश प्रक्रिया ९ ते १५ ऑक्टोबर, संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पूर्ण केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com