Career
Career

ऑनलाइन फॉर्म - इमेजेस अपलोड करताना

वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक 
कोणत्याही राज्यातील तसेच देशपातळीवरील परीक्षांचे ऑनलाइन फॉर्म भरतानाच्या प्रक्रियेमधील इमेजेस म्हणजेच फोटो, स्वाक्षरी किंवा अंगठा, निशाणी अपलोड करणे हाच अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या इमेजेसच्या आधारेच विद्यार्थ्याची ओळख पटवली जाते. कालच्या लेखात आपण फोटोबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे.
 
दक्षता घ्यावयाची कारणे
एमबीबीएस- वैद्यकीय प्रवेश हा अत्यंत जिव्हाळ्याचा, कळीचा व संवेदनशील असा विषय आहे. यामध्ये प्रवेशासाठी अनेक वर्षांपासून गैरप्रकार घडतात. नीट परीक्षा १५ लाख विद्यार्थी परीक्षा देतात. ‘एनटीए’ हे नवीन बोर्ड येऊनही तमिळनाडूमध्ये नीट-२०१९ घोटाळा घडला. प्रवेश झाल्यानंतर तो उघड झाला. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. 

स्वाक्षरीबाबत सूचना
     पांढरा स्वच्छ कागद घ्यावा. स्वाक्षरी साधारणपणे साडेतीन सेंटिमीटर बाय दीड सेंटिमीटर या आकारात बसवावी. वाटल्यास पेन्सिलने तात्पुरते चौकोन काढावेत व स्वाक्षरीनंतर ते खोडावेत.
     स्वाक्षरीसाठी पेन वापरताना मध्यम जाडीचा असावा. एकदम कमी जाडीचा अथवा स्केचपेनसारखा मोठ्या जाडीचा पेन वापरू नये. शक्यतो पॉइंट फोर बोल्ड पेन वापरावा. कागदावरती वेगवेगळ्या तीन ते चार स्वाक्षऱ्या कराव्यात. त्यापैकी एक निवडावी.
     स्वाक्षरीचा आकार पाच केबी ते तीस केबीपर्यंत असावा. स्वाक्षरीचे स्कॅनिंग करताना पूर्ण ए-फोर पेज वापरावे.
     स्वाक्षरीचा कागद स्वच्छ, पांढरा नसल्यास त्यातील काळेपणा स्कॅनिंगमध्ये दिसून कागदाच्या बॅकग्राऊंडचा काळा कलर दिसतो. अशी इमेज अपलोड केल्यानंतर स्वाक्षरीला बॅकग्राऊंड कलर येऊन चौकोन दिसतो. 

अंगठा निशाणीबाबत...
     सद्यःस्थितीत मागील वर्षापर्यंत ‘नीट’, जेईई वगैरे परीक्षांच्या फॉर्ममध्ये आधार लिंकिंग असल्यामुळे हाताच्या अंगठ्याचा ठसा अपलोड करणे बंद झालेले आहे. परंतु आजही कृषीसाठीच्या देशपातळीवरील ‘एआयईईए’बरोबरच काही इतर फॉर्ममध्ये अंगठा, निशाणी अपलोड करण्याची आवश्यकता असते. यंदा नीट तमिळनाडू तोतयागिरी प्रकरणामुळे कदाचित नीट-२०२० साठी अंगठा निशाणी लागू होऊ शकते. 
     माहितीपत्रकामधील सूचनांप्रमाणे योग्य त्या हाताच्या अंगठ्याची निशाणी नोंदवताना भरपूर शाई लावू नये. निशाणीमध्ये रेषा स्पष्टपणे दिसणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यासाठी एका स्वच्छ पांढऱ्या कागदावर पॅडमध्ये एकदाच अंगठा बुडवून त्याच्या आधारे तीन ते चार ठसे उमटवावेत व त्यामधून योग्य तो ठसा निवडावा. शाई बटबटीत असणे महत्त्वाचे नसून रेषा सुस्पष्ट दिसणे आवश्यक आहेत.
     हव्या त्या केबी आकारामध्ये स्कॅनिंग करताना इमेज बसवावी व जेपीईजी फॉर्मेटमध्ये सेव्ह करावी. 

सारांश
एका पेन ड्राइव्हवर फोटो, स्वाक्षरी, अंगठा निशाणी (उजव्या व डाव्या दोन्ही अंगठ्यांची) योग्य त्या आकारामध्ये सेव्ह करून ठेवावी. इमेजेस सेव्ह करताना त्यांना योग्य ते फाइल नेम देणे गरजेचे आहे. इमेजेस व्यवस्थित नियमाप्रमाणे अपलोड न केल्यास फॉर्म बाद होऊ शकतो. दरवर्षी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पुन्हा-पुन्हा ईमेजेस अपलोड करण्यासाठी एसेमेसद्वारे सूचना दिल्या जातात. नीट, एमएचटीसीईटी ऑनलाइन फॉर्म भरताना कोणतीही कागदपत्रे अपलोड करावी लागत नाहीत. फक्त फोटो, स्वाक्षरी या इमेजेस अपलोड कराव्या लागतात.
नीट - नॅशनल इलिबीलीटी कम एन्ट्रन्स एक्झाम (राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा) ऑनलाइन फॉर्म २ ते ३१ डिसेंबर या कालावधीत नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या www.nta.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com