बालवयातच शिक्षणावर भर

Education
Education

जावे त्यांच्या देशा - हेरंब कुलकर्णी, शिक्षण विषयक अभ्यासक, फिनलॅंड
सिंगापूरच्या शिक्षणव्यवस्थेतील वैशिष्ट्यांचा आणि बलस्थानांचा विचार आपण करत आहोत. या मालिकेत आज सिंगापूरच्या अजून एका वैशिष्ट्याचा विचार करू.

बालवयीन शिक्षणावर भर : सिंगापूर या देशात बालवयीन शिक्षणावर अधिक भर दिला जातो. हे या शिक्षणव्यवस्थेचे एक वैशिष्ट्याच आहे. ‘ज्या झाडाची मुळे पक्की ते झाड अधिक चांगले बनते’ असाच विचार करून बहुधा सिंगापूर प्रशासन बालवयीन शिक्षणाला अधिक प्राधान्य देऊ करते. खूप लहान असतानाच सिंगापूरमधील मुलांची शाळांशी ओळख करून दिली जाते.

सिंगापूरमध्ये बालवयीन शिक्षणाचे एक वर्ष अंगणवाडी (nursery) आणि २ वर्षे शिशुवर्ग (kindergarten) असे दोन भाग सामान्यपणे मानता येतात. या तीन वर्षांच्या काळात मुलांना सामान्य भाषाज्ञान, वाचन, संभाषण, सामाजिकतेची जाणीव, कल्पकता आणि कौशल्ये यांचे ज्ञान दिले जाते.

त्यांच्या शारीरिक विकासाकडेही लक्ष दिले जाते. या काळात सिंगापूरमधील मुले २ प्रमुख भाषा शिकतात हे या शिक्षणपद्धतीतील महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. यातली एक भाषा इंग्रजी असते आणि दुसरी चायनीज, मलाय, आणि तमी यापैकी एक होय. 

अशा प्रकारचे हे दोन्ही बालवयीन शिक्षणाचे वर्ग सिंगापूर शाळांतर्गत जानेवारी ते नोव्हेंबर या काळात घेतले जातात. आणि साधारण जून महिन्यात उन्हाळ्यात त्यांना १ महिना सुट्टी असते. या पद्धतीने बालवयीन शिक्षणानंतर वयाच्या ७ व्या वर्षानंतर प्राथमिक शाळेत प्रवेश घेतात.

प्राथमिक शाळेचा काळ हा साधारण ६ वर्षांचा असतो. यात चार वर्षे शिक्षण कालावधी आणि २ वर्षांचा मार्गदर्शन घेण्याचा कालावधी समाविष्ट असतो. मुलांना सामान्य गणित, इंग्रजी भाषेबाबतीत अचूक आकलनक्षमता, आणि मातृभाषेचे धडे देणे हे प्राथमिक शाळांचे उद्दिष्ट असते. या वयात या शाळांमध्ये मुलांमध्ये पाठ्याक्रमेतर कौशल्यांची रुजवण केली जाते आणि त्यांना याबद्दल प्रोत्साहनही दिले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com