एस्टोनियातील सुसंगत शिक्षणप्रणाली

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 August 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

जावे त्यांच्या देशा - हेरंब कुलकर्णी, परदेशी शिक्षणविषयक अभ्यासक, फिनलंड
एस्टोनियाच्या शिक्षणपद्धतीविषयी आपण माहिती जाणून घेत आहोत. एस्तोनियाच्या शिक्षणपद्धतीचे निरीक्षण करताना समोर येणारे एक आश्‍चर्य म्हणजे, ज्याप्रमाणे शिक्षणासाठी राज्य आणि नगरपालिका साह्य करते, त्याचप्रमाणे महाविद्यालयीन शिक्षणाकरताही विशिष्ट अनुदान दिले जाते.

एस्टोनियामध्ये छंद शाळा आणि युवा कामांची एक संपूर्ण प्रणाली आहे. ही प्रणाली सोव्हिएत प्रणालीचा एक वारसा म्हणता येईल. खरं तर, आठवड्यातून किमान एक आफ्टरस्कूलमध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या पालिकेकडून निधी मिळतो. हॉबी एज्युकेशनच्या स्टँडर्डनुसार ध्येयवादी तरुणांना ‘चांगल्या प्रतीचे कौशल्य असलेल्या समाजातील सदस्य’ म्हणून विकसित होण्यास मदत करणे आणि ‘छंदातून आनंद मिळवणे’ समाविष्ट आहे. छंद शाळा खेळ, तंत्रज्ञान, संस्कृती, निसर्ग, संगीत किंवा इतर कला कशाचाही असो, एस्टोनियामधील प्रीस्कूलप्रमाणेच छंद शाळा खासगीरीत्या चालविल्या जाऊ शकतात किंवा इतर संस्था चालवू शकतात.

छंदाधारित शाळांमध्ये शिक्षक बहुतेक वेळा विद्यापीठातील विद्यार्थी किंवा विशिष्ट विषयातील तज्ज्ञ असलेले इतर असू शकतात. प्रत्येक आठवड्यात ते विद्यार्थ्यांच्या गटासह कार्य करतात.  उदाहरणार्थ, एका शाळेजवळच्या विद्यापीठातील भौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञांनी असा तास घेतला, ज्यामध्ये अंतराळात सोडण्यात आलेल्या उपग्रहाच्या विकासात विद्यार्थ्यांनी भाग घेतला. ही क्रिया विद्यार्थ्यांसाठी रोमहर्षक आणि उत्कंठावर्धक होती. यातून त्यांना अनेक प्रश्‍न पडले आणि त्यांची जिज्ञासाही वाढली. थोडक्यात, एस्टोनियान लोकांनी एक सुसंगत आणि संरेखित शिक्षण प्रणाली विकसित केली आहे. ती सुरवातीपासून म्हणजे बालपणात सुरू होते आणि नियमित शाळेच्या पलीकडे महाविद्यालयापर्यंत वाढत जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Heramb Kulkarni edu supplement sakal pune today