अमेरिकेतील शिक्षण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

जावे त्यांच्या देशा - हेरंब कुलकर्णी, परदेशी शिक्षण विषयक अभ्यासक
युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका या देशाबद्दल भारतात कमालीचे कुतूहल पाहायला मिळते. या देशातील आयुष्य, अधिक चांगल्या नोकरीच्या संधी याची स्वप्ने अनेक भारतीयही पाहतात. आता आपण या देशातील शिक्षणव्यवस्था कशी चालते? शिक्षण व्यवस्थेतील चांगले आणि वाईट घटक कोणते याविषयी चर्चा करूया. 

सामान्यपणे आपली कल्पना अशी असते, की अधिक औद्योगिक प्रगती असलेल्या देशांमध्ये आधी उत्तम शिक्षणव्यवस्था पाहायला मिळेल. मात्र अमेरिकेचे निरीक्षण करता हे काही प्रमाणातच सत्य म्हणावे लागते. कोणती शिक्षणपद्धती अधिक चांगली याचा १९९० च्या दशकात नंतर जेव्हा शोध घेतला गेला, तेव्हा याच काही देशांची नावे घेतली गेली. यानंतर १९९५च्या सुमारास मात्र जेव्हा ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक को-ऑपरेशन फॉर डेव्हलपमेंट (ओईसीडी) अशा शास्त्रीय चाचण्यांच्या माध्यमातून सर्वेक्षणातून पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला गेला. विविध देशांची शैक्षणिक क्रमवारी आणि प्रतवारी अभ्यासण्याचा प्रयत्न झाला. त्या वेळी असे लक्षात आले, की अमेरिकेतील काही विद्यापीठे उत्तम कार्य करत होती, परंतु त्याचबरोबर काही विद्यालये प्राथमिक प्रगतीचेही चित्र दाखवत नव्हती. प्रादेशिक सर्वेक्षणातून हा निष्कर्ष हाती लागला, की विद्यापीठांच्या परिस्थितीत अस्थिरता दिसते. यापूर्वी असेच चित्र असूनही, जी काही उत्तम विद्यापीठे त्यांच्या प्रगतीविषयी अधिक विचार केला जाऊन अमेरिकेची शिक्षणव्यवस्था कशी उत्तम आहे याविषयी सर्वत्र समज निर्माण केला गेला होता. अमेरिकेतील शिक्षणव्यवस्थेविषयीचा, त्याच आधुनिकतेचा समज चुकीचा आहे, हे लवकरच लक्षात आले. 

आजही अमेरिकेतील शिक्षणव्यवस्थेमध्ये काही कच्चे दुवे आहेत, त्याचप्रमाणे काही बलस्थाने देखील आहेत. अमेरिकेतील उच्चशिक्षण अत्यंत चांगल्या प्रतीचे आहे. अमेरिकेतील शिक्षणपद्धतीच्या अशाच अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी आपण पुढील भागापासून जाणून घेऊयात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Heramb Kulkarni edu supplement sakal pune today