परदेशातील शैक्षणिक धोरणांचा परिणाम

Foreign-Education
Foreign-Education

जावे त्यांच्या देशा - हेरंब कुलकर्णी, शिक्षण विषयक अभ्यासक, फिनलंड
गेल्या काही लेखांमधून आपण विविध देशांतील शिक्षणव्यवस्था आणि शिक्षणपद्धतीविषयी माहिती घेतली. आत्तापर्यंत सर्वप्रथम फिनलंड, नंतर जपान, सिंगापूर, स्वित्झर्लंड, एस्टोनिया, युएसए या देशातील शिक्षणपद्धतींचा एक एक करून आढावा घेतला. आता त्यांचा समग्र विचार करून त्यातील उल्लेखनीय गोष्टींचा आढावा घेऊया आणि नंतर भारत या सर्व देशांकडून काय घेऊ शकतो, कोणत्या पद्धती भारतात अधिक लागू होऊ शकतात, कोणत्या पद्धती भारत नव्याने निर्माण करू शकतो याचा विचार करूया.  

फिनलंडचा विचार करताना असे लक्षात येते की, या शिक्षण पद्धतीत शिक्षक आणि शासन महत्त्वाची भूमिका बजावते. शासनाचा शिक्षण आणि शिक्षणपद्धती यावर वरदहस्त असल्याचे प्रकर्षाने जाणवते. शिक्षण क्षेत्रामध्ये कमालीचा वैज्ञानिक दृष्टिकोन दिसून येतो. सूक्ष्माकडून स्थूलाकडे काम करणारी ही शिक्षणपद्धती आहे. त्यामुळे विद्यार्थ्याच्या शिक्षणक्षेत्रातील प्रथम पायरीपासूनच फिनलंड त्यांच्यावर कष्ट घ्यायला सुरवात करते. व्यावसायिक शिक्षणाची संकल्पना या देशात समर्थपणे राबवलेली दिसते.

जपानचा विचार करताना असे लक्षात येते की, या देशात मुलाच्या वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत त्यांना परीक्षांना सामोरे जावे लागत नाही. जपान शाळेतील स्वच्छता, पोषक आहार यांकडे विशेष लक्ष देतो. विद्यार्थ्यांमध्ये मैत्रिगूण वाढीस लागावेत याकडेही जपान विशेष लक्ष देते. सांस्कृतिक शिक्षण देणे आणि विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक वारसा जपणे यासाठीही प्रोत्साहन दिले जाते. या आणि अशा अनेक कारणांमुळे जपानमध्ये विद्यार्थी हजेरी ९९ टक्क्यांपेक्षा अधिक असते. 

सिंगापूर हा देश शिक्षणाच्या बाबतीत शिक्षक प्रशिक्षणावर अधिक भर देतो. देशाचा शिक्षक अधिक सक्षम असल्यास विद्यार्थी अधिक वेगाने प्रगती करू शकतात या धारणेतून सिंगापूर काम करतो. वाढत्या स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी सक्षम विद्यार्थी तयार व्हावा, यासाठी सिंगापूरच्या शिक्षणपद्धतीत विद्यार्थी हा केंद्रबिंदू असतो. 

स्वित्झर्लंड, एस्टोनिया आणि अमेरिका या देशांबाबतचा एकत्रित आढावा पुढच्या आठवड्यात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com