बिझनेस वुमन : जेट सेट गो!

kanika
kanika

बिझनेस वुमन - कनिका टेकरीवाल

पर्यटन, व्यवसाय यासाठी प्रवास करणे आता सोपे होत चालले आहे. उबर, ओलासारख्या टॅक्‍सी सेवांमुळे कोणत्याही क्षणी हव्या त्या ठिकाणी जाण्यासाठी वाहन उपलब्ध होते. मात्र हाच प्रवास खूपच दूरचा असेल तर? दिल्लीतील व्यावसायिक कनिका टेकरीवालपुढेही हाच प्रश्‍न होता आणि तिने "जेट सेट गो' या कंपनीच्या माध्यमातून विमान कंपन्या व ग्राहकांमधील मध्यस्थ बनल्या आहेत. त्या आपल्या कंपनीचे वर्णन "उबर इन द स्काइज' असे करतात.

कंपनीद्वारे विमान कंपन्यांची विमाने भाड्याने घेणे, ग्राहकांसाठी ती उपलब्ध करून देणे, त्याचे वेळापत्रक आखणे, प्रवासाचे दर ठरविणे अशी कामे केली जातात. कनिका एका उद्योजक कुटुंबाची सदस्य आहे आणि तिच्या रक्तातच व्यवसाय आहे. ही कंपनी सुरू करण्याच्या प्रक्रियेबद्दल कनिका सांगते, ""भारतात खासगी विमान बुक करणे हे फार कटकटीचे असल्याचे सांगणारे अनेक जण मला भेटत होते. व्यवसायासाठी प्रवास करताना विमान मिळविणे अशक्‍य असल्याचे त्यांचे मत होते. तर दुसरीकडे अनेक खासगी जेट विमानांचे मालक वाढत्या किमती, सततची देखभाल व इतर खर्चांमुळे आपली विमाने विकून टाकत असल्याचेही चित्र होते. याच संदर्भात ब्रिटनमधील माझ्या एका मित्राबरोबर बोलताना मला "जेट सेट गो'ची कल्पना सुचली. मी याची घोषणा करताच सगळे जण मला खूप हसले, पण अल्पावधीतच ही कल्पना सत्यात उतरवली.''

कनिकाने 2014मध्ये या कंपनीची स्थापना केली. दिवसभरात अनेक शहरांत फिरावे लागणारे व्यावसायिक, परदेशी पर्यटक, तातडीची गरज निर्माण झाल्याने एका शहरातून दुसरीकडे जाणारे प्रवासी, दुर्गम भागात देवदर्शनासाठी जाणारे भाविक यांना तिने सुरवातीच्या काळात विमाने उपलब्ध करून दिली. ""भारतात 200 विमानतळे आणि धावपट्ट्या आहेत, मात्र त्यातील केवळ 80 ठिकाणी व्यावसायिक विमानांचे उड्डाण होते. मात्र त्यातही कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याने व्यावसायिक उड्डाणे तोट्यात होती. माझ्या कंपनीने ग्राहक आणि कंपन्यांतील दुवा बनत ही समस्या सोडवली. मी केवळ 100 डॉलर खिशात असताना हा व्यवसाय सुरू केला व आता माझ्याकडे 70 कर्मचारी असून, व्यवसायात दुप्पट वाढ झाली आहे. कंपनीपुढे अद्यापही अनेक समस्या असल्या, तरी मी या व्यवसायात आनंद मिळवत आहे.'' भविष्यात ही सेवा पूर्ण भारतभर देण्याचा कनिकाचा मानस आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com