Vijayraj-Bodhankar
Vijayraj-Bodhankar

रंगसंवाद : अक्षरांचे चित्रझरे

पहिलीत असताना ते काळ्या पाटीवर पांढऱ्या लेखणीने चित्र काढायचे आणि घरी आल्यावर आईला दाखवीत म्हणायचे ‘बघ, मी चितलं काढलं.’ आई हसत त्यांना म्हणायची ‘अरे बाळा, ते चित्र नव्हे, बाराखडीतली अ ब क ड ई अक्षरे आहेत.’ तेव्हापासून ते अक्षराला चित्रच समजत आले आणि पुढचा शोध घेताना ते अस्वस्थ होत गेले. त्याच अनेक वर्षांच्या अस्वस्थतेतून लॉकडाउनच्या काळात जन्माला आलेली ‘अक्षरचित्र’ ही चित्रमालिका. ही मालिका साकारणारे चित्रकार आहेत ठाण्यातील विजयराज बोधनकर.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भीती, राग, दुःख, द्वेष, लोभ, वासना, वेदना, आनंद, क्रोध असे अनेक भावशब्द आहेत जे आपण रोजच्या वापरातून व्यक्त होतो; पण त्या भावना आकारहीन असतात, त्याला आकार नसतोच आणि नेमक्‍या याच गोष्टीचा बोधनकर चित्रकार म्हणून शोध घेत राहतात. लहानपणी भाबड्या मनाने अक्षराला चित्र बोलून गेल्यावर त्यांचं अक्षर म्हणजे नेमकं काय, याचं सतत चिंतन सुरू होतं. त्यातून त्यांना खूप दिवसांनंतर गवसलं, अक्षर म्हणजे ध्वनिचित्रे!  

बोधनकर यांनी ‘अक्षरचित्र’ मालिकेला सहज सुरुवात केली आणि त्याविषयी आस्था वाढतच गेली. या मालिकेत त्यांनी सत्तरावं चित्र नुकतंच रेखाटलं आहे. पुढे किती चित्रकलाकृतींची भर पडेल, याचा कुठलाही संकल्प त्यांनी केला नसला तरी या कलाकृती रसिकांना वेगळा चित्रानंद देणाऱ्या आहेत. अक्षरचित्रे कॅनव्हासवर निर्माण करता आली आणि पुढे अव्याहत सोबत करीत राहतील, याचा त्यांना आनंद आहे. या चित्रांत जिज्ञासा आहे. अनेक अक्षरांच्या स्वररेषातून व अक्षर ढगांचे स्वतःचे मूळ रूप एकमेकांत गुंफताना किती वेगळं रूप घेऊ शकतात हा भाव आहे. चित्र शेवटी एकाच तत्त्वावर येऊन थांबतं आणि ते म्हणजे सौंदर्यशास्त्र. अमूर्तचा शोध किंवा बोधाची अपेक्षा न करता केवळ सौंदर्याचा आस्वाद घ्यावा म्हणजे ते चित्र मनात घर करू शकतं. बोधनकरांच्या चित्रांतील हे अक्षरचिंतन कलाआस्वादकांना आणि अभ्यासकांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com