सायकल चालविणे आणि पोहणे

Swimming
Swimming

हेल्थ वर्क
दमश्‍वासाच्या व्यायामात चालणे किंवा धावणे याबरोबरच पोहण्याचाही समावेश होतो. सायकल चालविणे हादेखील दमश्‍वासाचा एक उत्तम व्यायाम आहे. अनेक लोक रोजच सायकल चालवत असतात. त्यांच्या दृष्टीने हा व्यायाम नव्हे, कारण व्यायामाची हालचाल वेगळी आणि मनोरंजक असायला हवी. सामान्य जीवनात कधीही सायकल चालवत नाहीत, अशांसाठी हा व्यायाम फारच चांगला आहे. एकतर अर्ध्या तासात तुम्ही असाल तिथून शहराच्या थोडे बाहेर जाऊ शकता. मोकळी हवा मिळते. मनात आल्यास सायकल कडेला लावून ठेवायची आणि पुढे पळत, चालत जायचे किंवा डोंगर चढायचा. 

पोहण्याच्या व्यायामात एकाच वेळेस हात आणि पाय हलवले जातात. धावण्यापेक्षा यात स्नायूंचा सहभाग मोठा असतो. धावण्यात कितीही तरबेज असला, तरी तितक्‍याच सहजतेने पोहणे शक्‍य होत नाही, त्याचे कारण हेच आहे. पोहताना हात आणि पायाला एकाच वेळेस प्राणवायू पुरवायचा असतो. त्यामुळे सुरवातीला फुफ्फुसे आणि हृदयावर धावण्यापेक्षा जास्त ताण पडतो. त्यामुळे एकदम पहिल्या दिवशी जास्त पोहू नये. त्यातच पाण्याच्या दाबामुळे सर्व रक्त हृदयाकडे ढकलले जाऊन हृदयाचा आकारदेखील थोडासा वाढतो. पाण्याच्या दाबामुळे श्‍वास घ्यायलाही अशक्त लोकांना जड वाटते. पोहण्यामुळे हातापायांना चांगला व्यायाम घडतो. पोट व पाठीच्या स्नायूंना स्थिर ताकदीचा व्यायाम होतो.

पोहताना घ्यायची काळजी
१.    १०० मीटर न दमता पोहता आल्यावरच कुणाला न सांगता पोहा. 
२.    पोहण्याआधी व नंतर स्वच्छ अंघोळ करा. 
३.    पोहण्याचा वेळ हळूहळू वाढवा. ३० ते ४० मिनिटे सतत पोहता आल्यास स्टॅमिना ठीक आहे, असे समजा
४.    सर्दी, ताप असल्यास पोहू नका.
५.    पोहण्याच्या आधी एखादे बिस्कीट, कपभर दूध असे थोडेसे खायला हरकत नाही. त्यामुळे दमणूक कमी होते. 

(उद्याच्या अंकात - दोरीवरच्या उड्या आणि डोंगर चढण्याचा व्यायाम)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com