शरीर आहे तसे समजून घ्या

All-Is-Well
All-Is-Well

आरोग्यमंत्र
शरीरस्वास्थ्यनियोजन हे पहिले समजा, कारण तुम्हाला या जगात शरीराच्याच आधारावर सर्व प्रकारचा आनंद घ्यायचा आहे. आपल्याला जशा प्रकारचे शरीर मिळाले आहे, ते आपल्या डोळ्यादेखत वृद्ध होत जात असतानादेखील अधिकाधिक कार्यक्षम ठेवायचे आहे. त्यामुळे आपले शरीर आहे तसे समजून घ्या. त्याच्या आकारमानाविषयी कोणतीही खंत मनात असल्यास काढून टाका.

हे तुमचे आणि फक्त तुमचेच शरीर आहे. फक्त तुम्हीच त्याला जबाबदार आहात. शरीरात तीन मुख्य गुण असतात. ते आपण सतत वाढवू शकतो.

ताकद, लवचिकपणा आणि दमश्‍वास हे ते गुण होत. त्यासाठी आपल्याला सहज जमेल अशाच वेळी एक तास वेळ काढायला शिका. उगाच सकाळी पाचला उठून व्यायाम करणार, अशा अघोरी प्रतिज्ञा करू नका. आपल्या घराण्यात कुणीही इतक्‍या लवकर उठलेले नाही, हे विसरू नका. आपले शरीर चुकीचे वापरल्याने किंवा अजिबात न वापरल्याने खराब होत असते. चुकीचे उठणे, बसणे, वाहन चालविणे आणि प्राप्त परिस्थितीत कॉम्प्युटर ही शरीराला अत्याधिक पीडा देणारी कारणे होत. याबाबतीत दुखते ते चुकीचे असते, हा सोपा नियम लक्षात ठेवावा. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध सर्वच प्राणी झगडत असतात. मनुष्यप्राणीही त्याला अपवाद नाही. अंतराळात जवळजवळ सर्वच शारीरिक दुःखे नाहीशी होतात आणि पृथ्वीवर परतल्यावर तीही परततात. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध उत्तम तोललेले शरीर सुखात राहते. गुरुत्वाकर्षणाने वाकत चाललेल्या शरीराची ढब बिघडत जाते आणि सुख जाऊन दुःख येते. 

(उद्याच्या अंकात वाचा - अंतःकरण साफ ठेवण्याची पहिली पायरी)

वाचकांना आवाहन
आपले प्रश्‍न-शंका, सूचना, आवडलेले विषय आणि सहभागासाठी 
आम्हाला जरूर कळवा - ई मेल -  sakalwellness@gmail.com
फेसबुक आणि ट्विटरवरही आम्हाला कळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com