रक्तदाबाचा ‘दाब’

Blood-Pressure
Blood-Pressure

आरोग्यमंत्र - डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयरोग तज्ज्ञ 
मला आज रक्तदाबाच्या गोळ्या सुरू केल्या आहेत, मी लगेच उद्या रक्तदाब मोजावा का?  
कुठल्याही उच्च रक्तदाबावरील औषधांना आपले परिणाम चालू करण्यास किमान ६ ते ७ दिवस लागतात आणि त्यांचा पूर्ण पटीनं येण्यास २ ते ३ आठवडे लागतात. त्यामुळे लगेच आपला रक्तदाब तपासू नये. 

दवाखान्यामध्ये गेल्यावरच माझा रक्तदाब खूप वाढतो, घरी तो सामान्य असतो असे का? मग मला खरंच उच्च रक्तदाब आहे का? 
दवाखान्यात गेल्यावर येणाऱ्या मानसिक तणावामुळे, आपला रक्तदाब वाढण्याचा संभव असतो. यालाच व्हाईट कोट हायपरटेन्शन असे म्हणतात. यासाठी आपला रक्तदाब हा घरी संध्याकाळी आपण ज्या वेळी पूर्णपणे तणावमुक्त असताना सलग आठवडा मोजावा आणि ते आपल्या डॉक्‍टरांना दाखवावे. त्यामध्ये आपला रक्तदाब वाढलेला आला तर आपणास औषधे सुरू करावी लागू शकतात. याव्यतिरिक्त २४ तास अंबुलटोरी बीपी मॉनिटर हे यंत्र लावून २४ तासांचा सरासरी रक्तदाब मोजता येऊ शकतो. यामुळे आपल्याला खरंच उच्च रक्तदाब आहे का, याचे निदान होण्यास मदत होते. 

दुकानांमध्ये मिळणारी रक्तदाब मोजण्याची यंत्रे अचूक असतात का? त्यांचा वापर करावा का? 
दंडावरील रक्तदाब मोजणारी डिजिटल यंत्रे हे उपयुक्त असतात. त्यातील काही यंत्रे प्रमाणित केलेली असतात. ती पूर्णतया अचूक नसली तरी त्याने आपल्या उपचारामध्ये मदत होऊ शकते. वर्षातून एकदा याची अचूकता तपासण्यासाठी आपल्याकडील उपकरण आपल्या डॉक्‍टरांच्या दवाखान्यात नेऊन त्याची अचूकता तपासून पाहावी. घरी रक्तदाब मोजणे म्हणजे डॉक्‍टरांना ना दाखवता औषधे घेणे असे नाही, ते पूरक आहे पर्यायी नाही. 

खूप औषधे सुरू आहेत, मी ती कशी लक्षात ठेवू? 
कधीकधी आपल्या औषधांचा मागोवा ठेवणे कठीण असते. परंतु न चुकता गोळ्या घेणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्‍यक आहे. या काही गोष्टी केल्यास ना चुकता औषधे घेणे शक्‍य आहे. दररोज एकाच ठरलेल्या वेळी आपले औषध घेणे, दात घासणे, नाश्‍ता, जेवण इत्यादी दैनंदिन गोष्टींबरोबर गोळ्या घेण्याची सांगड घाला, आठवड्यासाठी वेगवेगळे कप्पे असलेले पिल बॉक्‍स वापरा , कुटुंब आणि मित्रांना तुमच्या औषधांची आठवण करून देण्यास सांगा, आपल्या स्मार्टफोनवर एक स्मरणपत्र सेट करा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com