फॅमिली बिझनेसचे यशस्वी नेतृत्व (संजना देसाई)

फॅमिली बिझनेसचे यशस्वी नेतृत्व (संजना देसाई)

बिझनेस वुमन
वाडवडिलांनी स्थिरस्थावर केलेला व्यवसाय यशस्वीरीत्या पुढे घेऊन जाण्याचे मोठे आव्हान पुढच्या पिढीवर असते. संजना देसाई यांनी ही जबाबदारी यशस्वीरीत्या पेलली. देसाई ब्रदर्स लिमिटेडची उपकंपनी असलेल्या मदर्स रेसिपीच्या मुख्य धोरणात्मक अधिकारी म्हणून त्या आपली जबाबदारी पार पडत आहेत. 

फॅमिली बिझनेसमध्येच उतरण्याचे ध्येय स्पष्ट असल्याने फायनान्स आणि अर्थशास्त्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेलेल्या संजना मास्टर्स पूर्ण करून लगेच भारतात परतल्या. फॅमिली बिझनेस असल्याने व्यवसायात प्रवेश करणे सोपे असले, तरी स्वतःला सिद्ध करणे महत्त्वाचे असते. यासाठी सर्व विभागांत काम करून व्यवसायाची नस जाणून घेतल्याचे त्या सांगतात. 

व्यवसायाविषयी संजना देसाई सांगतात, ‘खाद्यपदार्थांचा व्यवसाय तुलनेत सोपा समजला जातो. मात्र, ग्राहकांच्या पसंतीस उतरण्यासाठी विशेष प्रयत्न घ्यावे लागतात. मदर्स रेसिपीचा विस्तार देशभर असल्याने विविध राज्यातील ग्राहकांच्या पसंतीस उतरण्यासाठी स्थानिक मसाले, खाण्याच्या पद्धती, परंपरा आणि ग्राहकाची रुची यांचा बारीक विचार करून पदार्थ बनवावा लागतो.’ मदर्स रेसिपी मुख्यतः मसाले आणि ‘रेडी टू कुक’ खाद्यपदार्थ उत्पादनांमध्ये कार्यरत असल्याने प्रॉडक्‍टच्या गुणवत्तेवर आणि प्रिझर्व्हेटिव्हजचा कमीत कमी वापर करून पदार्थ चविष्ट बनविण्यावर त्यांनी भर दिल्याचे त्या सांगतात.

व्यवसायवाढीसाठी वर्तमानातील ट्रेंड्‌स आणि भविष्यातील मागणी यांचा विचार करून ‘रेडी टू कुक’ खाद्यपदार्थांमध्ये उतरणे, इतर कंपन्यांशी धोरणात्मक करार किंवा त्या ‘टेक ओव्हर’ करून व्यवसाय वाढविण्यावर त्यांनी भर दिला. खाद्यपदार्थ व्यवसायात इतर अनेक आव्हानांसोबतच पाऊस, हवामान यांनादेखील तोंड द्यावे लागते. विविध हंगामामध्ये शेतातून निघणाऱ्या उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. मात्र, कंपनीच्या धोरणकर्त्या म्हणून कच्च्या मालाची खरेदी, साठवण यांसारख्या तुलनेने रुक्ष समजल्या जाणाऱ्या विभागांमध्ये बारीक लक्ष ठेवून त्या धोरणे आखण्यात यशस्वी झाल्या आहेत. मसाले किंवा खाद्यपदार्थ व्यवसायामध्ये देशातील अनेक महिला बचत गटाच्या माध्यमातून पुढे येत असताना याकडे स्पर्धा म्हणून न पाहता अतिशय सकारात्मकतेने महिलांनी पुढे यावे, असे त्यांचे मत आहे. भविष्यात भारतातच नाहीतर जगभरात या क्षेत्रात मोठी संधी असल्याचे त्या सांगतात. पुढील काळात विशेषतः भारताबाहेर व्यवसाय विस्तार वाढविण्यासाठी योजना तयार असल्याचे सांगताना त्यांचा आत्मविश्‍वास स्पष्ट जाणवतो.  

(शब्दांकन : प्रविण कुलकर्णी)

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com