महत्त्व जाणा भाषेचे (शिवराज गोर्ले)

महत्त्व जाणा भाषेचे (शिवराज गोर्ले)

बालक-पालक
बाळाला नवे नवे शब्द समजू लागले, बोलता येऊ लागले, ते भाषा शिकू लागले की आपण आनंदित होतो. बाळाचं शब्दभांडार जाणीवपूर्वक वाढवावं, याचीही आपल्याला कल्पना असते. आपल्याला कल्पना असते. मात्र, मुळात बाळ नवे नवे शब्द शिकतं तेव्हा ते फक्त भाषा शिकत नसतं. खूप काही मोलाचं शिकत असतं, याची आपल्याला कल्पनाही नसते. मुळात भाषेचा उपयोग फक्त संवादासाठी नसतो. भाषेचं त्याहीपेक्षा महत्त्वाचं असं कार्य असतं हे आपण विसरत असतो. मूल शब्दांच्या साह्यानं किती वेगवेगळ्या दृष्टीनं मोठं होत असतं... शब्दांची खरी किमया काय असते याचं अतिशय सुंदर विवेचन डॉ. ह. वि. सरदेसाई यांनी ‘घरोघरी ज्ञानेश्‍वर जन्मती’मध्ये केलं आहे. त्यातील काही अतिशय महत्त्वाचे मुद्दे असे आहेत.

प्रथम समजून घेऊया भाषेचं संवादापलीकडचं महत्त्वाचं कार्य कोणतं. माणसानं शब्द आणि भाषा विकसित केली. प्राण्यांना मात्र भाषेचं ज्ञान नसतं. यामुळे माणूस आणि इतर प्राणी यांच्यात नेमका कोणता फरक पडतो? तर सारासार विचार, तार्किकता हे गुण त्यांच्या ठायी असत नाहीत. याचं कारण या गुणांचं प्राथमिक अधिष्ठान असते भाषा. भाषेचं हे महत्त्व आपण ध्यानात घेत नाही. केवळ भाषाज्ञान नसल्यानं जनावरं पूर्वानुभव आधारित असा विवेक, संयम दाखवू शकत नाहीत. प्रत्येक नव्या प्रसंगी नैसर्गिक प्रेरणांनाच बळी पडतात. डॉ. सरदेसाई म्हणतात, ‘सहज, सुलभ भावभावनांना मुरड घालण्याची शक्‍यता आणि स्वातंत्र्य फक्त मानवामध्येच संभवते. कारण मानवाला विशिष्ट गुणधर्म असणारे मन असते. मनाला जी अलौकिक शक्ती प्राप्त होते ती कुठून येते? मानवी व्यक्तिमत्त्वाचा तो प्रचंड पसारा ते मन तरी कशाच्या आधारावर सांभाळू शकते? या प्रश्‍नाचे उत्तर एकच आहे ते म्हणजे भाषा. 

भाषा हे साधन हाताशी आहे. म्हणून तर बालसंवर्धन, बाल बुद्धिसंवर्धन हे साधता येते. बाळाला भाषा अवगत होते, ती समज निर्माण करता येते. याच आधारावर त्याचे एका सुसंस्कृत मानवात रूपांतर करणे शक्‍य होते. भाषेचा उपयोग केवळ मूल आणि माता-पिता यामध्ये संवाद साधणे एवढाच नसतो. भाषेमुळे, शब्द ज्ञानामुळे मूल स्वतःशी, स्वतःच्या मनाशी संवाद करू शकते हाच भाषेचा सर्वांत मोठा उपयोग आहे.
(पूर्वार्ध)

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com