बालक-पालक : यशासाठी भावप्रज्ञा...

बालक-पालक : यशासाठी भावप्रज्ञा...

बालक-पालक
मुलांनी फक्त परीक्षेत नव्हे, तर पुढे करिअरमध्ये आयुष्यात यशस्वी व्हावं असं वाटत असल्यास पालकांनी मुलं भावप्रज्ञ, म्हणजेच भावनिकदृष्ट्या प्रगल्भ कशी होतील, यासाठी दक्ष असायला हवं. त्या दृष्टीनं प्रयत्न करायला हवेत. मात्र या संदर्भात पालक काहीसे संभ्रमात दिसतात. एकतर ‘भावनिक बुद्धिमत्ता’ ही संकल्पना त्यांना संदिग्ध वाटते. दुसरा मुद्दा - भावप्रज्ञा ही यशासाठी इतकी महत्त्वाची असते, म्हणजेच भावनिक कौशल्यांचा यशात एवढा मोठा वाटा असतो का, याबद्दल ते साशंक असतात. अशी साशंकता असणाऱ्या पालकांसाठी - तुमच्या मते यशस्वी मंडळींकडं कोणकोणते गुण, क्वालिटीज आढळून येतात किंवा आवश्‍यक असतात अशा गुणांची यादी करा. ती नक्कीच अशी असू शकेल. भरघोस, टिकाऊ यश हवं असल्यास योग्य निवडणं, त्यांना सहभागी करून घेणं, प्रेरित करणं आवश्‍यक असतं. यश टिकवणं अवघड असतं, तसंच ते पचवणंही अवघड असतं. यशानं हुरळून जायचं नसतं, अपयशानं खचून जायचं नसतं. यशाचा कैफ आणि अपयशाची मरगळ या दोन्ही पाय घसरणाऱ्या, निसरड्या जागा असतात. दोन्ही वेळा तोल सांभाळणं गरजेचं असतं.

खरा विजेता कधीच मैदान सोडत नसतो आणि मैदान सोडणारा कधीच जिंकत नसतो. यशासाठी वेड, ध्यास, झपाटलेपण हवं. यशासाठी फक्त इच्छा नव्हे संकल्प हवा; फक्त संकल्प नव्हे, दृढसंकल्प हवा! निर्णय नव्हे, मनोनिग्रह हवा, बांधिलकी हवी. यशासाठी स्वतःच्या क्षमतांवर विश्‍वास हवा, स्वतःच्या मर्यादांचं भानही हवं. यशासाठी स्वतःच्या क्षमतांवर विश्‍वास हवा, स्वतःच्या मर्यादांचं भानही हवं. यशासाठी कठोर परिश्रम हवेत, प्रयत्नांत सातत्य हवं. यशासाठी संयम, सबुरी, चिकाटी हवी; कारण जिथं ‘हातोटी’ हतप्रभ होते, तिथं चिकाटी बाजी मारून जाते. यशासाठी जोखीम घेण्याइतकं धैर्य हवं...

ही यादी आणखीही वाढवता येईल. हे सारे गुण मानसिक, भावनिक प्रगल्भतेशी संबंधित आहेत, याबद्दल दुमत होऊ शकत नाही. प्रश्‍न आहे तो मुलांमध्ये ही भावनिक बुद्धिमत्ता कशी जोपासता येईल? खेळ, सहली, शिबिरं, स्नेहसंमेलने, विविध स्पर्धा, छोटे मोठे प्रकल्प, उपक्रम, कामगिऱ्या, जबाबदाऱ्या... या सर्व माध्यमांतून व त्या त्या वेळच्या सुयोग्य संवाद व मार्गदर्शनातून हे नक्कीच साधता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com