मुलांमध्ये एकाग्रता असतेच!

Edu
Edu

बालक-पालक
‘मुलं कधी स्वस्थ बसतात का? सारखी चुळबूळ करीत असतात. त्यांचं अभ्यासात लक्ष नसतं. त्यांचं चित्त स्थिर नसतं. सतत अळमटळम सुरू असते. सांगितलं त्यापेक्षा त्यांना दुसरंच काही करायचं असतं. एकाग्रता अशी नसतेच का मुलांत?’ पालकांचा हा कायमस्वरूपी प्रश्‍न असतो. डॉ. आरती व डॉ. अतुल अभ्यंकरांनी या प्रश्‍नाला दिलेलं उत्तर हे पालकांना मार्गदर्शक ठरावं, ते उत्तर, मार्गदर्शन असं आहे.

काहीही शिकायचं म्हटलं तर एकाग्रता हवीच. पण अभ्यासाच्या बाबतीत अगदी कुशाग्र बुद्धीच्या (म्हणजे खरं तर सर्वच!) मुलांमध्ये एकाग्रतेचा अभाव का आढळतो? पालकांनी हे समजून घ्यायला हवं, की लहान मुलं, त्यांच्या आवडीनं कुठलीही कृती करतात तेव्हा त्यांच्यात कमालीची! एकाग्रता आढळते. अशा सगळ्याच गोष्टींतूनही त्याचं शिक्षण होतच असतं. तेही सहजतेनं व वेगानं. त्याचबरोबर त्यांची कौशल्यही वाढत असतात.

शिकण्याकरिता योग्य अशा अवतीभवतीच्या अनेक गोष्टी जणू त्यांना साद घालत असतात. त्यामुळे एका पाठोपाठ गोष्टी आत्मसात करत मुलांचा ऊर्जा सतत वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होताना दिसते.

लहान मुलांच्या बाबतीत असं आढळलं, की काही वेळा ते एक गोष्ट आत्मसात करून झटकन दुसऱ्या गोष्टीकडे जातात तर काही वेळा एकाच गोष्टीत तल्लीन होऊन जातात. उदा. मूल पाण्याचा नळ उघडझाप करून अनेक नवनवीन गोष्टी शिकत असतं... नवे ‘शोध’ लावत असतं किंवा एखादं फुलपाखरू पाहून त्याच्यामागे जाताना स्वतःलाही विसरत असतं.

मुलांमध्ये एकाग्रता असतेच. बऱ्याचदा शिकण्यासाठी त्यांचे पर्यायही तेच निवडतात व शिकत असताना त्यांना स्वातंत्र्य हवं असतं. थोडक्‍यात काय, मुलांचं नैसर्गिक प्रक्रियेतून शिक्षण सहजगत्या होत असतं तेव्हा एकाग्रता आपोआप होते. पण त्यांच्या उपजत कुतूहलाकडे दुर्लक्ष करून, ते दडपून त्यांना न आवडणाऱ्या, (त्यांच्या दृष्टीनं) निरर्थक गोष्टी अट्टहासानं शिकवल्या जातात. या ‘अभ्यास’ प्रक्रियेचा त्यांना कंटाळा येतो. कंटाळवाण्या वाटणाऱ्या प्रक्रियेत मुलं एकाग्र कशी होतील. दोष मुलांचा नाहीय.

‘अभ्यासा’चा आहे. ठराविक अभ्यास, ठराविक पद्धतीनेच करायला हवा या अट्टहासाचा आहे. अभ्यास करतेवेळी खेळासारखंच वातावरण असेल तर मुलं तोही आनंदानं करतील. जेव्हा तो मुलांच्या नैसर्गिक शिक्षण प्रक्रियेतलाच अविभाज्य भाग बनेल तेव्हा त्यासाठी पालकांना स्वतःचा दृष्टिकोन बदलावा लागेल.

वाचकांना आवाहन
आपले प्रश्‍न-शंका, सूचना, आवडलेले विषय आणि सहभागासाठी आम्हाला जरूर कळवा -
ई मेल - edusakalpage@gmail.com
फेसबुक आणि ट्विटरवरही आम्हाला कळवू शकता. 
हॅशटॅग वापरा #EDUNokariCareer

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com