नीलची समरहिल - शाळा नव्हे संकल्पना

Edu
Edu

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
आतापर्यंत आपण सुजाण पालकत्वाचे विविध पैलू समजून घेतले. पालक म्हणून मुलांशी कसं वागावं, कसं बोलावं, त्यांना आनंदानं कसं वाढू द्यावं यासाठीची छोटी छोटी सूत्रं, त्या संदर्भातल्या काही टिप्स समजून घेतल्या. हे पालकत्वाचं शिक्षणच होतं... अभ्यासच होता, पण तो संपलेला नाही. उलट आता आपण जरा वरच्या अभ्यासक्रमाकडे वळणार आहोत. होय, मुलं जसं वरच्या इयत्तेत जातात, तसं पालकांनीही आता वरच्या पातळीवरचं शिकून घ्यायचं आहे. वरच्या इयत्तेत प्रवेश घ्यायचा आहे! आपल्या मुलांचं शिक्षण, त्यांचा विकास, त्यांचं भवितव्य याबद्दल ज्यांना खरोखरी आस्था आहे; मुलांचं व्यक्तिमत्त्व संपन्न, सुसंस्कृत, समृद्ध व्हावं, अशी ज्यांची कळकळ आहे; त्यांचं आयुष्य त्यांना आनंदानं जगता यावं अशी ज्यांची तळमळ आहे. अशा पालकांसाठी हा एक वैचारिक जागर असणार आहे.

या पुढच्या टप्प्यात बालक-पालक संदर्भातल्या दोन अत्यंत महत्त्वाच्या व मूलभूत संकल्पना, आपण (शक्‍य तितक्‍या) सर्वांगानं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या दोन संकल्पना अशा आहोत. एक - ज्ञानरचनावाद दोन - समरहिल.

ज्ञानरचनावादाकडे आपण नंतर वळू. प्रथम समरहिल ही संकल्पना समजून घेऊ. खरं तर समरहिल ही एक शाळा आहे, पण ती सर्वसाधारण शाळा नव्हे. ती एक मूर्तिमंत नवी कल्पना/संकल्पनाच आहे. इंग्लंडमधील लायस्टन (सफोको येथे ए. एस. नील या बंडखोर आणि द्रष्ट्या शिक्षकानं सुरू केलेला तो एक नवा प्रयोग आहे.)

मुलांना काय वाट्टेल ते करायला मोकळीक देणारी... उनाड मुलांची शाळा... असं तिच्याबद्दल म्हटलं जायचं. तीच नंतर जगभरातल्या शिक्षणतज्ज्ञांसाठी आणि जागरूक पालकांसाठी खास आकर्षणाचं केंद्र ठरली आहे. फ्रेड एम. हेशिंगर यांनी म्हटलं, या मर्त्य जगात जिला मरण नाही अशी विलक्षण संकल्पना म्हणजे समरहिल. नील असोत वा नसोत जोपर्यंत माणूस जगतो अन्‌ शिकतो आहे, तोपर्यंत तीही असेलच!

नीलची शाळा समरहिल या पुस्तकात (अनुवाद ः हेमलता होनवाड, सुजाता देशमुख) स्वतः ए. एस. नील यानं उलगडलेली ही संकल्पना, म्हणजेच त्याच्या क्रांतिकारक कल्पना आपण समजून घेणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com