गात गात शिकूया

Edu
Edu

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
गाणी तर मुलांना आवडतातच. मुलं सूर, तालाचा मनसोक्त आनंद घेतात. बालवाडीत तर गाण्याची रेलचेल असते. 

त्यामुळेच गाणे हे मुलांना ‘आनंदाने शिकते’ करण्याचं एक उत्तम साधन आहे. कोल्हापूरच्या सृजन आनंद विद्यालयात गाणे हे शिकण्याचं एक सुरेल साधन म्हणून वापरलं जातं. त्यासाठी नवनवी गाणी शिक्षक रचतात - काही वेळा मुलंही.  या ‘सुरेल’ प्रयोगाचा निर्मला पोतनीस यांनी करून दिलेला हा परिचय - पालकांनीही रमून जावा असा... 

प्रार्थना म्हणताना 
शाळेत प्रार्थना म्हटल्या जातात, पण वर्षानुवर्षे त्याच, तशाच. मुलं प्रार्थनाही यांत्रिकपणे, निर्विकारपणे म्हणत असतात. शिक्षकांनाही फारसा रस नसतो. प्रार्थना मुलांनी समरस होऊन म्हणायला हव्यात. त्या त्यांच्या हृदयापर्यंत पोचायला हव्यात. त्यासाठी नव्या, सोप्या चाळीच्या, सोप्या शब्दांच्या प्रार्थना का रचू नयेत? या अशाच काही प्रार्थना 

दिसाकाठी शांत बसावे । मिटुनी डोळे घ्यावे । क्षणभरी 
एकाग्र करोनी । आपुल्या मनाला। आपण पाहावे । निरखोनी 
सर्वांठायी मैत्री । प्रेम आणि आदर। आहे ना भेटोनि । अंतरात 
भांडण सोडावे । प्रेम द्यावे - घ्यावे। सर्वांसाठी गावे । मंगलगाणे 
वनसृष्टीनं महत्त्व सांगणारी ही प्रार्थना 
वनसृष्टी ही माय माउली, तुमची आमची सर्वांची । 
पशुपक्ष्यांची, प्राण्यांची 
अन्‌ माणूस आणिक माशांची । 
रक्षण करूया वनसृष्टीचे, आपण आपुल्या झाडांचे । 
जतन करूया वनराईचे । तुपल्या आपल्या आईचे । 
अन्‌ ही ‘भूगोला’तली ‘दिशावंदना’ 
सहा दिशांना वंदन करूया 
आवडीने गुण गाऊया ।।धृ।। 
उत्तरेचा निर्मळ वारा, गंगामाईच्या निर्मलधारा । 
उत्तरेला वंदन करू या। आवडीने गुण गाऊया ।। १ ।। 
सहसा रुक्ष मानल्या गेलेल्या ‘भूगोल’ विषयातही नटलेला निसर्ग असा गीतरूपानं प्रकटला!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com