घरानंही शिकवावं, शाळेनं घर व्हावं

Education
Education

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
शिक्षणातील नवविचारांवर आधारित अशा अनेक प्रयोगशील शाळा खुद्द शास्त्रज्ञांनीच जगभरात उभ्या केल्या आहेत. आपल्याकडची अशीच एक शिक्षणाची प्रयोगशाळा म्हणजे ग्राममंगलचं ‘लर्निंग होम.’ या ‘आनंदघर’नुसार आता शिक्षणात घर व पालकांची भूमिका अशी आहे - 

घर-कुटुंब-परिसर हे मुलांना शिकण्यासाठीच्या विविध संधी प्रभावीपणे मिळण्याचं सर्वोत्तम ठिकाण आहे. 

पालकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास, मुलांची शिक्षणप्रक्रिया प्रभावी होऊ शकते. 

पालक मुलांचे शिक्षकच असतात. पालकांची कौशल्यं, त्यांचा व्यवसाय याचाही उपयोग मुलांच्या शिक्षणात होऊ शकतो. 

मुलांच्या शिकणाऱ्या गटाची जबाबदारीही पालक उचलू शकतात. 

मुलांच्या विविध विकासाची नोंद पालकही ठेवू शकतात. 

या ‘आनंदघरा’ची उद्दिष्टे अशी - 
 घराचं रूपांतर उत्तम शिक्षण व्यवस्थेत करणं. 
 मुलांचं घर व पालक यांनी शिकतं होणं. 
 घर, शिकणारा गट व शिक्षक यात समन्वय साधणं. 
 आत्मविश्‍वास, निर्णयक्षमता, प्रश्‍न सोडविणं, वैज्ञानिक दृष्टिकोन अशा जीवनोपयोगी क्षमता मुलांत विकसित होणं. 
 पर्यावरणाशी नातं, नागरिकत्वाची जाण, मूल्यांची जपणूक, सामाजिकता... हे सारं सहजतेनं विविधांगानं व्यक्तिमत्त्वात समाविष्ट होणं. 
 शालेय अभ्यासक्रमातील क्षमतांच्या पूर्ततेबरोबरच शिक्षण व दैनंदिन व्यवहार यांची सांगड घालता येणं व शिक्षण जीवनोपयोगी होणं. 
 कला, सौंदर्य, साहित्य, भाषाविषयी संवेदनशीलता व अभिरुची तयार होणं. 
 मुलांमधील सांगीतिक, भाषिक, गणिती, शारीरिक, अंतर्व्यक्ती, निसर्गविषयक अशा बुद्धिमत्तांचा शोध घेऊन त्या विकसित होणं. 
 मुलांना ज्ञानग्रहणाचे सर्व आयाम व मार्ग माहीत होणं. जिज्ञासा वाढणं. मुख्य म्हणजे ही उद्दिष्टे घरानं व शाळेनं - पर्यायानं पालकांनी व शिक्षकांनी परस्पर सहकार्यानं साकार करणं. घरानं शिकवणं, शाळेनं घर होणं! 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com