esakal | Coronavirus : धार्मिक स्थळं बंद करणं योग्य नाही पण...

बोलून बातमी शोधा

Coronavirus : धार्मिक स्थळं बंद करणं योग्य नाही पण...

टाळ्या वाजवून भावना व्यक्त करणं स्वागतार्ह

- अनेक ठिकाणं लॉकडाऊन

- धार्मिक स्थळंही बंद

Coronavirus : धार्मिक स्थळं बंद करणं योग्य नाही पण...
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे. आत्तापर्यंत 4 रुग्णांना कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे देशात मोठी भीतीचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल देशाला संबोधित भाषण केलं. त्यावेळी त्यांनी देशवासियांना घाबरू न जाण्याचे आवाहनही केले.

पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणात जनता कर्फ्यूची घोषणा केली. त्यानुसार येत्या रविवारी 22 मार्चला घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. तसेच रुग्णालय, विमानतळावर आज लाखो लोक सेवा बजावत आहेत. त्यांना कोरोनाची बाधा होण्याची जास्त शक्यता असूनही ते हे काम करत आहेत.

पंतप्रधान मोदींचा उद्देश काय?

पंतप्रधान मोदींनी देशवासियांसाठी कर्फ्यूची घोषणा केली असली तरीदेखील यामध्ये त्यामागचे कारण काय हे स्पष्ट होत नाही. एक दिवस सर्व व्यवहार, जाणं-येणं बंद करून खरंच यावर मात करता येणार का? हा खरा प्रश्न आहे. पण हे सर्व करताना मोदींनी देशवासियांमध्ये किती सतर्कता आहे हे पाहायचे आहे. त्यानुसार ही कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे.   

टाळ्या वाजवून भावना व्यक्त करणं स्वागतार्ह

सध्या देशात कोरोनासारखी भयंकर परिस्थिती आहे. तरीदेखील अनेक रुग्णालय आणि विमानतळांवर मोठ्या प्रमाणात कर्मचारी तैनात आहेत. ही सर्व मंडळी आपला जीव धोक्यात घालून सेवा बजावत आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवाजे उघडून, खिडकीमध्ये उभे राहून त्या सर्वांचे, घंटी, थाळी आणि टाळ्या वाजवून भावना व्यक्त करणं ही बाब खरोखरच स्वागतार्ह आहे.  

प्रशासनाकडून घेतली जातेय योग्य खबरदारी

कोरोना व्हायरसची लागण इतरांना होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. त्यानुसार कार्यवाही केली जात आहे. विविध ठिकाणी कामकाज बंद करण्यात आले आहे. तसेच परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी वेळीच काळजी घेतली जात आहे. 

अनेक ठिकाणं लॉकडाऊन 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणं लॉक डाऊन करण्यात आली आहेत. खबरदारी म्हणून प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला. 

धार्मिक स्थळंही बंद

चर्च, मंदिर, मशीद यांसारखी अनेक प्रार्थनास्थळं बंद करण्यात आली आहेत. अशाप्रकारचे आदेशच प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत. वास्तविक पाहता, हे करणे योग्यच आहे. एक भक्त म्हणून जर पाहिले तर धार्मिक स्थळं बंद करणे न पटणारे असू शकेल पण देशाचा जबाबदार नागरिक म्हणून पाहिले तर हे करणे गरजेचेच आहे. कारण, धार्मिक स्थळांवर सर्वाधिक गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व लोक एकत्र येऊ शकतात. याचा थेट परिणाम होऊ शकतो.