स्वतःभोवतीचे जग सुंदर बनवा (श्री श्री रविशंकर)

श्री श्री रविशंकर
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

"आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली" शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा "सकाळ पुणे टुडे"च्या "ऑल इज वेल"; पुरवणीत...

चेतना तरंग 
एखाद्या नदीला वाहण्यासाठी दोन किनाऱ्यांची गरज असते. नेहमीच्या नदीत पाणी नियंत्रित असते, पुरादरम्यान त्याला कुठलीही दिशा नसते. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील ऊर्जेलाही वाहण्यासाठी एक प्रकारची दिशा आवश्‍यक असते. आज बहुतेक लोक गोंधळलेले आहेत, कारण त्यांच्या आयुष्याला दिशाच नाही. आपण आनंदी असतो, तेव्हा आपल्यात मोठ्या प्रमाणात जीवनऊर्जा असते. मात्र, ती प्रवाहित नसल्यास तुंबते. त्यामुळेच जीवनऊर्जेला एका दिशेने प्रवाहित राहण्यासाठी बांधीलकी आवश्‍यक ठरते. जीवन बांधीलकीमुळे पुढे जाते.

आपण आपल्या आयुष्यातील छोट्या-मोठ्या गोष्टींचे निरीक्षण केल्यास त्या एका विशिष्ट बांधीलकीने पुढे जात असल्याचे लक्षात येईल. एखादा विद्यार्थी बांधीलकीतून शाळा किंवा महाविद्यालयात प्रवेश घेतो. कुटुंबात हीच बांधीलकी असते. आई मुलाप्रती वचनबद्ध असते, तर मुलाची बांधीलकी पालकांशी असते. पती पत्नीशी आणि पत्नी पतीशी बांधीलकी ठेवतो. ही बांधीलकी मोठी असल्यास त्या प्रमाणात गोष्टी सोप्या होतात. त्यामुळेच, बांधीलकी कमी असल्यास आपण गुदमरतो, कारण आपली बांधीलकीची क्षमता खूप अधिक असते. आपण अनेक कामे हातात घेतो, तेव्हा त्यापैकी एखादे चुकीचे होते. अशावेळी आपण इतर कामांवर लक्ष्य केंद्रित करू शकतो. त्यामुळे आपण त्या विशिष्ट कामाच्या अपयशाचा कमी परिणाम होतो. दुसऱ्या बाजूला, आपण एकच काम हाती घेतले आणि त्यात अपयशी ठरलो, तर त्याचा मोठा परिणाम घडतो. सामान्यत: आपली बांधीलकी स्रोतांवर अवलंबून असते.

आपण प्रयोगाच्या पातळीवर मोठी बांधीलकी दाखविल्यास हे स्रोत आपोआप आकर्षित होतात. आपण वचनबद्ध असलेल्या गोष्टीच आपल्याला ताकद देतात. तुमची कुटुंबाप्रती बांधीलकी असेल, तर कुटुंबच तुम्हाला आधार देते. आपण समाजाबद्दल बांधीलकी जोपासत असल्यास समाजाच्या आधाराचा आनंद लुटू. दूरवरचा विचार केल्यास अशी बांधीलकी आयुष्यात नेहमीच सुखकारक ठरते. प्रत्येकाने हे जग जगण्यासाठी अधिक चांगले बनवण्याची बांधीलकी जोपासावी. स्वतःमध्ये अशी बांधीलकी कायमस्वरूपी जोपासल्यामुळे तुम्ही जगासाठी प्रिय व्हाल. चैतन्य पदार्थांसाठी, तर पदार्थ चैतन्यासाठी महत्त्वाचा ठरतो. ते एकमेकांसाठीच बनलेले असतात. एकमेकांना ते पकडून ठेवतात. तुम्ही चैतन्याचा अनादर केल्यास पदार्थाचे महत्त्व उरणार नाही. तुम्ही चैतन्याचा आदर केल्यास जगाचीही काळजी घ्याल. जगाची अशी काळजी घेतल्यावरच जगही तुमची काळजी घ्याल. तुम्ही स्वप्ने पाहत नाही, तोपर्यंत ती ओळखता येणार नाहीत. प्रत्येक शोध हा स्वप्नातूच लागलाय. त्यामुळे अशक्‍य गोष्टींची स्वप्ने पाहा. अर्थात, तुमच्या कल्पित क्षमतेच्या पलीकडील गोष्टींचा यात समावेश होतो, हे तर स्पष्टच. काही स्वप्ने तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करतात, तर काही नाही. तुम्ही काही स्वप्ने लक्षात ठेवतात, तर काही विसरता. आपण सर्व जणच या जगात काहीतरी अद्वितीय आणि आश्‍चर्यजनक करण्यासाठी जन्मलो आहोत. अनेकदा मोठी स्वप्ने पाहणाऱ्या व्यक्तींची चेष्टा केली जाते. मात्र, ते खंबीरपणे आपली स्वप्ने सत्यात उतरवतात. त्यामुळे काहीतरी सर्जनशील करा. आयुष्यातील एक वर्षही सर्जनशीलतेशिवाय जाऊ देऊ नका. 

Web Title: article sri sri ravishankar all well sakal pune today