रहस्य यशस्वी वैवाहिक जीवनाचे...

Sri-Sri-Ravishankar
Sri-Sri-Ravishankar

चेतना तरंग
भारतीय संस्कृतीत विवाहसंस्थेला विशेष महत्त्व आहे. ती संयम, त्याग, एकमेकांची काळजी, देवाणघेवाण आदींवर उभारलेली आहे. आपले पूर्वज विवाहातील सप्तपदींबद्दल बोलत असत. यशस्वी वैवाहिक जीवनाचे रहस्य हे बांधिलकीची भावना, सहकार्य, करुणा, काळजी घेणे आणि कमी अहंकारात आहे. वैवाहिक नातेसंबंध सशक्त किंवा कमकुवतही बनवू शकतात, ते आपल्या मनावर अवलंबून आहे. मन मजबूत असल्यास नातेसंबंध आपल्यासाठी एक प्रकारची भेटच असते. मात्र, मन कमकुवत आणि नियंत्रणात नसल्यास हेच नातेसंबंध बंधनासारखे वाटतात. तुम्ही एकमेकांच्या माना पकडल्यास ते बंधन वाटेल. याउलट तुम्ही एकमेकांसोबत खांद्याला खांदा भिडवून चालल्यास ते सहकार्य होईल. त्यामुळे एकमेकांना सहकार्य करणारे सहकारी व्हा आणि सहजीवनाची वाट चाला. वैवाहिक जीवनात तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला स्वतःचा भाग समजावे लागते. तुम्हाला तुमचा जोडीदार तुमच्या हात, पायासारखा वाटायला हवा. तुमची शरीरे दोन असली तरी मन, आत्मा एकच असायला हवा. त्यामुळे तुमच्या जोडीदाराची चव तुम्ही स्वत:ची चव समजा. तुझी चव ही माझी चव आहे, असे सांगायला तुम्ही सुरवात करा. तुमची चव जोडीदारापेक्षा वेगळी होऊ लागते, तेव्हा संघर्षाला सुरवात होते. ‘तुझा आनंद हाच माझा आनंद आहे. मी तुझ्यासाठी येथे आहे,’ असे तुम्ही म्हणायला हवे. त्याचप्रमाणे जोडीदाराला तू माझ्यासाठी काय करशील, असा प्रश्‍न विचारल्यास दोघेही दु:खी होतील.

आनंदी विवाहसंबंधांमध्ये प्रत्येक जोडपे मी तुझ्यासाठी कायम येथे आहे, प्रसंग सुखाचा असो की दुःखाचा, असे म्हणते. आयुष्यात काहीवेळा यश मिळते, तर काहीवेळा अपयश. मात्र, प्रत्येक वेळी मी तुझ्यासोबत असेल, हा विश्‍वास जोडीदाराला देण महत्त्वाचे. 

आपण वैवाहिक आयुष्यातील काही सामान्य समस्यांचा ऊहापोह करू...
मालकी हक्काची भावना : अनेक वेळा केवळ या भावनेमुळे तुमचे मन जोडीदाराशी तसेच वागते. मग ते नातेसंबंध विवाहापूर्वीचे असतील वा नंतरचे. तुमच्या मनात अतिमालकीहक्काची भावना असल्यास दुसरी व्यक्ती पळूनच जाईल. त्यामुळेच आपल्या आवडत्या व्यक्तीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणे ही फार काही योग्य कल्पना नव्हे. मालकीहक्कामुळे नकारात्मक भावनांची मालिका उगम पावते.

स्वत:ला खूष करणे - अनेकदा तुम्हाला जोडीदाराकडून खुशामत करून घ्यायला आवडते. तुम्ही निराश चेहऱ्याने आपल्या जोडीदाराला आनंदी करण्याची अवघड भूमिका पार पाडता. प्रेमी जीव नेहमीच असे करतात. ते आपल्या जोडीदाराची अशी दिशाभूल करण्यात खूप शक्ती वाया घालवतात आणि वर्तमान क्षणाचा आनंद गमावतात. स्वतः निराश चेहऱ्याने इतरांकडून खुशामतीची अपेक्षा करणाऱ्या व्यक्ती इतरांना एकप्रकारे दूरच करतात. एखाद्या वेळी तुम्ही निराश मूड दाखविणे ठीक असते. मात्र, पुन:पुन्हा तेच करणे योग्य नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com