आध्यात्मिक प्रवासाच्या वाटेवर...

Journey
Journey

चेतना तरंग
दिव्याला ज्वलनासाठी ऑक्‍सिजनची गरज असते, त्याचप्रमाणे जीवनाचेही आहे. दिव्याची ज्योत काचेने पूर्णपणे बंदिस्त केल्यास ती आतील ऑक्‍सिजन संपल्यावर विझेल, अगदी त्याचप्रमाणे तुमचे जीवन बंदिस्त केल्यास ते संपुष्टात येईल. आपला छोटासा मेंदू एक किंवा दोन भाषांसाठी बनविला आहे. आपण विचार करतो, की सर्व प्रकारचे ज्ञान आणि समजूतदारपणा आपला मेंदू ग्रहण करेल. प्राण्यांच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास आपल्या भाषेला काहीच अर्थ नाही. मांजर किंवा कुत्रा तुम्हाला ऐकत असेल, तर त्यांच्यासाठी ते केवळ म्याव म्याव किंवा भुंकण्याप्रमाणे आहे. तुम्ही दीर्घकाळ त्यांना तुमच्या भाषेचे प्रशिक्षण दिले, तरच ते ही भाषा थोडीफार ओळखू शकतील. अन्यथा, त्यांच्यासाठी ते विशिष्ट आवाजाव्यतिरिक्त काही नाही.

आपली भाषा, बुद्धिमत्ता आणि आपले मन तसेच त्याचा दृष्टिकोनही खूप मर्यादित आहे. अगदी माझे इंग्रजीमधील लेखनही प्रत्येकाला समजू शकत नाही. ते विविध भाषांमध्ये भाषांतरित करावे लागते, असे मला म्हणायचे आहे. आपल्याला नेहमी असे वाटते की, आपण कारण शोधू शकतो, त्यातील तर्कसंगती लावून अस्तित्वातील सर्व गोष्टी समजून घेऊ शकतो. मला सर्वकाही माहीत आहे, हे कारण त्यामागे आहे. या विचाराने आपल्याला निष्क्रियतेच्या आवरणात जखडून ठेवलेय. मात्र, मला माहीत नाही, ही वृत्ती जागरूकता निर्माण करते आणि तुम्हाला नेहमी जागरूक ठेवते. 

मला माहीत नाही, म्हणजे नेमके काय?
ही तर आध्यात्मिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे. निसर्ग आपली थोडीच गुपिते, गूढ उघड करत असतो. त्यामुळे, तुम्ही आश्‍चर्यचकित होता. खरंतर निसर्ग आश्‍चर्यचकित होण्याच्या अनेक संधी पुरवतो, त्याही एकदाच नव्हे तर पुन:पुन्हा. आयुष्य काय आहे, जाणीव म्हणजे काय, विश्‍व काय आहे, मी कोण आहे, आदी प्रश्‍नांचे आपल्याला आश्‍चर्य वाटते. मात्र, या टप्प्यापर्यंत तुम्ही आलात तर खूपच भाग्यवान आहात. ही तर अध्यात्माची, योगाची एका दिव्यत्त्वाच्या एकीकरणाची ताकद आहे. आश्‍चर्य ही एकीकरण किंवा संघटनेची प्रस्तावना होय. तुम्ही एकत्रित असता तेव्हा प्रत्येक गोष्टीबद्दल आश्‍चर्य व्यक्त करता. तुम्ही आजूबाजूला चालता, फुलाकडे पाहून तुम्हाला आश्‍चर्य वाटते. तुम्ही म्हणता, ‘वाव, हे फुलं किती बुद्धिमान आहे.’ प्रत्येक पाकळी, पानामधील, तसेच प्रत्येक मनुष्यामधील बुद्धिमत्ता ओळखा.

प्रत्येक मनुष्याकडे पाहा. त्याच्या डोळ्यातून जाणीव प्रतिबिंबित होते. त्याच्या बोलण्यातूनही ती दिसते. अनेकदा ती तुम्हाला प्रतिसाद देईल अथवा नाही. प्रत्येक दगडामध्येही ऊर्जाशक्ती असलेल्या प्राणाचे अस्तित्व असते. या पृथ्वीतलावर काहीही निर्जीव नाही. आपण सर्वजण जीवनाच्या समुद्रात तरंगत आहोत. अगदी सूक्ष्मजीवापासून संपूर्ण विश्‍वापर्यंत प्रत्येक जण आयुष्याच्या समुद्रातील शंख आहे. जाणीव वेळ आणि जागेच्या पलीकडे असते. ती केवळ कंपने आहेत, त्यामुळे तुम्हाला आश्‍चर्य वाटले, तर केवळ स्मितहास्य करत तुमचे डोळे बंद करा आणि स्वतःबरोबरचे एकत्रीकरण अनुभवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com