निकोप हृदयासाठी!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जून 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

चेतना तरंग
जगात काहीही कायमस्वरूपी नाही. प्रत्येक गोष्ट सातत्याने बदलते. आपण बरोबर आहोत, असा विचार तुम्ही करता तेव्हा इतर चुकीचे आहात असा विचारही करता. त्यानंतर तुम्हाला राग येता. याउलट इतर बरोबर आहेत, असा विचार केल्यावर तुम्ही स्वतःला चुकीचे समजता. यानंतर तुम्ही स्वतःला अपराधी समजता. तुम्ही दु:खी, कष्टी होता. या दोन्हीही प्रकारांत तुम्ही संतुलन गमावता. या द्वंद्वामध्ये तुमचे मन हेलकावे खाते. यातून बाहेर पडणे हाच जीवनाचा संपूर्ण उद्देश होय. हाच मोक्ष आहे. तुम्ही आयुष्यात कडू औषधाचा डोस घ्यायला हवा. यजुर्वेदात रुद्र या देवतेच्या स्रोतात असे म्हटले आहे, की या जगात सर्व प्रकारचे लोक आहेत. त्यात विश्‍वासघात करणाऱ्या, आपला शब्द न पाळणाऱ्या व्यक्तींचाही समावेश होतो. काही वेळा तुमचे मन वर-खाली होते. तुम्ही मनाची उतारावस्था अनुभवण्याची लाखो कारणे आहेत. तुम्हाला काहीही खाली खेचू शकते, कारण गोष्टी तुमच्याप्रमाणे घडत नाहीत. तुम्ही ज्ञानाचे शीड वापरून या सागरातून आपली जीवननौका चालवू शकता. तुमचे हृद्य प्रेम आणि करुणेने भरलेले असते तेव्हा तुम्ही अतिशय शक्तिशाली असता. तुम्ही स्वतःला कधीही कमी समजू नका. पृथ्वीवर चमत्कार भरपूर प्रमाणात आहेत.

प्रत्येकामध्येच कोणता तरी चमत्कार आहे. आपण ते शोधण्याची गरज नाही ते केवळ घडतात. तुम्ही विचाराल ते दिले जाईल. तुम्ही श्रद्धेने विचारा. प्रत्येक क्षणाला चमत्कार घडत असतो. प्रत्येक क्षण सुंदर आहे. त्याचप्रमाणे त्यात काही नवीनही दडलेय. एवढेच नव्हे, तर एखाद्या क्षणाला एखादी गोष्ट फारशी चांगली वाटत नसली, तरी दूरचा विचार करता त्यातून काहीतरी चांगले घडते. रामायणात श्रीराम लंकेत जाण्यासाठी पूल बांधत होते, तेव्हा अनेक माकडे त्यांना यात मदत करत होती. माकडांनी श्रीराम लिहिलेले दगड समुद्रात टाकले आणि ते तरंगू लागले. हे पाहून श्रीरामांनी दगडावर स्वतःचे नाव लिहून तो पाण्यात टाकला. मात्र, तो बुडाला. श्रीरामांना त्याचे आश्‍चर्य वाटले. हे पाहणारे माकड हसत त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही तुमच्या हातून फेकून दिलेले कसे तरंगेल? ते बुडेलच.’’ यालाही आध्यात्मिक महत्त्व आहे. ईश्‍वराचे नाव तुमच्यासोबत असते तेव्हा दु:खाच्या सागरातून तुम्ही तरंगता, असा याचा पहिला अर्थ, तर भक्त ईश्‍वरापेक्षाही खूप शक्तिशाली असतात. ते ईश्‍वरापेक्षाही खूप काही करू शकतात, असा दुसरा अर्थ. त्यामुळेच तुम्ही केवळ भौतिक श्रद्धांमध्ये अडकून पडू नका. तेथे भौतिक आणि शारीरिक नियम असतील. मात्र, भौतिक नियमांपेक्षाही श्रेष्ठ असे काही तेथे असणार. शारीरिक अस्तित्वापलीकडील जाणीव, भौतिक वस्तूपलीकडील मन समजून घ्यायला हवे. आपण याकडेच लक्ष द्यायला हवे. त्यामुळे तुम्ही तुमचे प्रेम, श्रद्धा आणि ताकदीकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हाला निकोप हृदयाची सर्वाधिक गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Sri Sri Ravishankar all is well sakal pune today