खऱ्या श्रद्धेचा अर्थ...

Chetana-Tarang
Chetana-Tarang

चेतना तरंग - श्री श्री रविशंकर,प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग
तुम्ही तुमचे वैराग्य लपवा आणि प्रेम व्यक्त करा. वैराग्य व्यक्त करण्याने आयुष्यातील उत्सुकता नाहीशी होते आणि प्रेम व्यक्त न केल्याने तुमच्यात अहंभाव येतो. वैराग्य व्यक्त करण्याने अहंकार येऊ शकतो. झाडाच्या मुळांप्रमाणे वैराग्य तुमच्या हृदयात लपवून ठेवा आणि एखाद्या पक्व फळाप्रमाणे प्रेम व्यक्त करा. तुमच्या कृतीच्या परिणामाविषयी अस्वस्थपणा येऊन तुम्ही गांगरून जाता, तेव्हा तुम्ही काय करावे? श्रद्धा आणि विश्वास ठेवा की, त्याचा परिणाम तुमच्या कल्पनेच्या पलीकडे चांगला असेल. श्रद्धेमुळे तुम्ही भक्त बनू शकता. अस्वस्थपणा हा अतिश्रमामुळे येणारा थकवाही असू शकतो. अशा वेळी निद्रा, बासरी आदी संगीत ऐकणे, थंड पाण्याने स्नान करणे याची मदत होऊ शकते. वैराग्य असू द्या. हे जाणा की, हे सगळे या ना त्या प्रकारे संपणार आहे आणि त्याने काही फरक पडत नाही. ध्यान आणि प्राणायाम हे तुम्हाला शांत करू शकतील. तुम्ही काहीतरी अतिमहत्त्वाचे काम करत असाल, तेव्हा मध्येच क्षणभर काहीतरी पूर्णपणे असंबद्ध आणि क्षुल्लक काम करा. यामुळे तुमची निर्मितीक्षमता वाढते. संबंधित कृती तुम्हाला त्या कृतीशी बांधून ठेवते. असंबद्ध कृती आयुष्यालाच एक खेळ बनवते.

खोटी सुरक्षितता तुमची श्रद्धा वाढू देत नाही. तुम्ही सुरक्षिततेचे कवच टाकून दिल्यावरच श्रद्धा वाढते. नको तेथे विश्वास ठेवणे म्हणजे खोटी सुरक्षितता. नोकरी, घर, मित्र यांच्यात सुरक्षितता पाहणे हा आभास आहे. तुमच्याकडे साऱ्या सांसारिक सुरक्षितता असल्या, तरी श्रद्धेविना तुम्ही भीतीच्या चक्रात अडकाल. तुम्ही तुमच्या आयुष्याला सुरक्षिततेचे कवच घालता, तेव्हा श्रद्धा दूर ठेवता. श्रद्धा हीच तुमची सगळ्यात मोठी सुरक्षा आहे. श्रद्धा तुमच्यात अचूकता आणते. पैसा बँकेत किंवा खिशात ठेवा, मनात नको. घर घराच्या जागी ठेवा, मनात नको. मित्र आणि कुटुंबीय आहेत त्या जागी ठेवा, मनात नको. मनातील स्वतःच्या मानलेल्या सगळ्या गोष्टी सोडून द्या. तुमचे शरीर जगाचे आहे. तुमचा आत्मा दिव्यत्वाचा आहे. दिव्यत्व हीच एकमेव सुरक्षा आहे. तुम्हाला नेहमी गरज आहे ते मिळत जाईल, हे समजून घेणे म्हणजे श्रद्धा. दिव्यत्वाला काही करण्याची संधी देणे म्हणजेच श्रद्धा.

आवाजांवर श्रद्धा ठेवा आणि मग शांततेवर श्रद्धा ठेवण्याकडे वाटचाल सुरू करा. आवाज सुखावह असल्यास त्यावर श्रद्धा ठेवा आणि तो असुखकारक असल्यास शांततेवर श्रद्धा ठेवा. कोणीतरी काहीतरी वाईट बोलते, तेव्हा तुम्ही त्यावर चटकन विश्वास ठेवता आणि मन जास्तच बेचैन होते. असुखकारक आवाजावर विश्वास ठेवण्याने मनात जास्त खळबळ निर्माण होते. अशा परिस्थितीत तुमची श्रद्धा शांततेकडे न्या. आवाजावर श्रद्धा ठेवा, उदा. मंत्र घोषाचा आवाज. मंत्रपठण आणि ज्ञान यापेक्षा शिळोप्याच्या आणि अफवा पसरवणाऱ्या गप्पांवर लोकांची जास्त श्रद्धा असते, असे दिसते. मंत्रघोष आणि ज्ञान यावर श्रद्धा ठेवा आणि शांततेवर विश्वास ठेवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com