'हा' आहे धर्म आणि अध्यात्मातील फरक

PNE19P10510_org
PNE19P10510_org

चेतना तरंग

आपल्याला धर्म आणि अध्यात्मातही स्पष्टपणे फरक करता यायला हवा. धर्म हा लोकांना विभक्त करतो, तर अध्यात्म एकत्र आणते. धर्म संकल्पनांपासून बनलेला असतो, तर अध्यात्म हे व्यावहारिक आणि जीवन आमूलाग्र बदलणारे असते. अध्यात्म लोकांमधील करुणा जागृत करून त्यांना सामान्य कारणांसाठी पुढाकार घेण्यास प्रेरित करते. त्याचप्रमाणे, ते उद्योगांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीवही (कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) आणते.

येत्या काही वर्षांमध्ये भारत संपूर्ण जगाला हिंसामुक्त समाजाची रचना कशी करायची, हे खरोखरच दाखवून देईल. वैविध्यात एकत्रता जोपासणाऱ्या या आनंदी व्यक्तींच्या समाजात अधिक समजूतदारपणा आणि संयम असेल. आपल्या राज्यांनाही मानवी चेहऱ्याची गरज आहे. त्यांची लोकांची धार्मिक आधारावर, बहुसंख्याक किंवा अल्पसंख्याक अशी विभागणी करता कामा नये. लोकांच्या उत्थानासाठी धर्माऐवजी त्यांची आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक मागासलेपणा हाच निकष असायला हवा. आज अनेक ठिकाणी हे घडतेय. आपल्याला बहुसांस्कृतिक, बहुधार्मिक शिक्षणालाही अधिक आक्रमकपणे उत्तेजन द्यायला हवे. राज्य मग ते काश्‍मीर असो केरळ, आसाम किंवा महाराष्ट्र देशातील सर्वच नागरिकांना समान अधिकार असावेत. त्याचप्रमाणे स्त्री-पुरुष समानतेलाही उत्तेजन द्यायला हवे.

आपल्याला अल्पकालीन ध्येयाचा विचार न करता देशाच्या विकासासाठी अविश्रांतपणे कष्ट करणाऱ्या दूरदृष्टीच्या नेत्यांची गरज आहे. तरुणाईला स्थान देण्यासाठी राजकारणात निवृत्तीचे वयही निश्‍चित करावे. अशा निवृत्त राजकारण्यांनी नव्या पिढीला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी पार पाडावी. मार्गदर्शन, अनुभव आणि ज्ञानासाठी निवृत्ती नसतेच. खेड्यांच्या स्वावलंबनाला आपण प्राधान्य द्यायला हवे. त्यासाठी "थिंक ग्लोबली, ऍक्‍ट लोकली' हे आपले धोरण असावे.

युवकांनी उद्योजक बनून जगातील नव्या संधींचा शोध घ्यावा. आज जगाला भेडसाविणाऱ्या समस्यांवर मानवतेला मार्गदर्शन करण्याची क्षमता भारतामध्ये आहे. त्यामुळेच, मी भारताला अध्यात्माचे जागतिक केंद्र म्हणून पाहतोय. आपला देश प्राचीन योगशास्त्र, आयुर्वेद, ध्यानातून संपूर्ण जगाला जीवनशैलीतील बदल आणि आरोग्य व सुदृढ समाजासाठी मार्गदर्शन करत आहेच. भारतासाठी आता जागतिक व्यासपीठावर योग्य स्थान पटकाविण्याची वेळ आलीय. त्यासाठी आपण अधिक आत्मविश्‍वासू बनून आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा अभिमान बाळगायला हवा. आधुनिक भारताला या समृद्ध प्राचीन वारशाचा विसर पडला असून, तो पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com