आनंदाच्या शोधात... (श्री श्री रविशंकर)

श्री श्री रविशंकर
शुक्रवार, 1 मार्च 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली! 
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

चेतना तरंग
प्रत्येक सजीवाला आनंदी व्हायचे असते. पैसा असो, अधिकार असो किंवा कामवासना हे सगळे तुम्हाला आनंद मिळवण्यासाठीच हवे असते. काही लोक दु:खात सुद्धा मजेत असतात, कारण त्यातून त्यांना आनंद मिळत असतो!

आनंद मिळवण्यासाठी आपण काही तरी शोधत असतो, पण ते मिळाल्यावरही आपण आनंदी नसतो. एखाद्या शाळकरी मुलाला वाटते की, तो महाविद्यालयामध्ये गेल्यावर त्याला अधिक मोकळीक मिळेल आणि मग तो आनंदी होईल. तुम्ही एखाद्या महाविद्यालयीन मुलाला विचारले की, तो आनंदी आहे का? यावर तो उत्तर देतो नोकरी मिळाल्यावर मी आनंदी होईल. नोकरी-व्यवसायात स्थिरस्थावर झालेली व्यक्ती आयुष्यात चांगला जोडीदार मिळाल्यावर आनंदी होईल, असे म्हणेल. त्याला त्याचा जोडीदार मिळतो, आता त्याला आनंदी होण्यासाठी एक मूल हवे असते. मुले असलेल्यांना विचारा, ते आनंदी आहेत का? ‘मुले चांगले शिक्षण घेऊन मोठी होऊन आपल्या पायावर उभी राहिल्याशिवाय आनंदी कसे होता येईल?’ असा प्रश्‍न ते विचारतील. निवृत्तांना तरुणपणीचे दिवस सुखाचे वाटतात. सगळे आयुष्य भविष्यात कधीतरी मिळणाऱ्या आनंदाची तयारी करण्यातच निघून जाते. आतून आनंदी असण्याची किती मिनिटे, किती तास, किती दिवस तुम्ही घालवले आहेत? तेवढेच क्षण तुम्ही खरे आयुष्य जगला आहात. आयुष्याकडे पाहण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे, काहीतरी विशिष्ट ध्येय साध्य केल्यानंतर मी आनंदी होईन. दुसरे म्हणजे काहीही झाले तरी मी आनंदीच आहे. तुम्हाला कोणत्या प्रकारचे आयुष्य जगायचे आहे? आयुष्य हे ८० टक्के आनंद आणि २० टक्के दु:ख असते. पण आपण या २० टक्‍क्‍यालाच धरून बसतो आणि त्याचे २०० टक्के करतो! आपण असे मुद्दाम करत नाही, ते आपोआप होते. या जगात सगळे काही नेहमीच अगदी अचूक असू शकत नाही. अगदी उदात्त, उत्तम, श्रेष्ठ अशा कृतीतही काही त्रुटी असतात. ते अगदी साहजिक आहे. दुर्दैवाने आपल्या मनाची वृत्ती अशी असते की, त्या त्रुटींनाच पकडायचे आणि घट्ट धरून ठेवायचे. आणि या सगळ्यात आपले मनस्वास्थ्य बिघडते.

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article By Sri Sri Ravishankar In All Is Well Supplement Of Sakal Pune Today