राज्याराज्यांत : पंजाब : नशेचा विळखा

Punjab
Punjab

अमली पदार्थांच्या विळख्यातून पंजाबची सुटका करण्यात आल्याचा दावा मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग हे वारंवार करत असले, तरी वस्तुस्थिती मात्र विपरित आहे. अमली पदार्थांचा विळखा पंजाबमध्ये वाढत असल्याचे चित्र आहे. 

अमलीपदार्थांच्या तस्करीबाबत दिल्लीत नुकतीच दोन दिवसांची परिषद झाली. त्या परिषदेत पंजाबमधील भीषण वास्तव पुन्हा एकदा सर्वांसमोर आले. पंजाब सरकारच्या आरोग्यविभागानेच दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात किमान ८० हजार युवक अमलीपदार्थांच्या विळख्यात सापडले आहेत. या सर्वांना हेरॉईनच्या सेवनाची सवय लागली. याचाच अर्थ दररोज सरासरी २२५ लोक अमलीपदार्थांच्या विळख्यात ओढले जात आहेत. याशिवाय २.०९ लाख जण अफीमचे सेवन करतात. या सर्वांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.  आरोग्य विभागाची ही अधिकृत आकडेवारी आहे. प्रत्यक्षात मात्र ही संख्या यापेक्षा कितीतरी अधिक असू शकते. 

जानेवारी ते डिसेंबर २०१९ या कालावधीत अमलीपदार्थांच्या विळख्यात सापडलेल्यांची संख्या ३५ टक्क्यांनी वाढली आहे. त्याशिवाय गेल्या वर्षांत पोलिसांनी सुमारे पाच हजार तस्करांना पकडले आहे. हे सर्व जण अमलीपदार्थांची तस्करी करत होते. याचाच अर्थ असा की राज्य सरकार आणि पंजाब पोलिसांचे दावे फोल आहेत. वास्तविकतः पंजाबमध्ये चोरट्यामार्गाने हेरॉईनची विक्री सुरूच आहे. 

पाकिस्तान, अफगाणिस्तानातून हिमाचल आणि दिल्लीत अमलीपदार्थ पोचविले जात असल्याची नवी माहिती पुढे आली आहे. अमलीपदार्थांचा चोरटा व्यापार थांबविण्यासाठी पंजाब सरकराने २०१७ मध्ये विशेष तपास पथक स्थापन केले. त्याचा परिणाम पहिले काही दिवस दिसला. काही दिवसांनी पुन्हा अमलीपदार्थांची तस्करी आधीप्रमाणेच सुरू झाली. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या माहितीनुसार 2015 ते 2018 या कालावधीत गांजा, हेरॉईन, अफीम, चरस आणि नशेच्या गोळ्या प्रचंड प्रमाणत जप्त करण्यात आल्या. या कावाधीत 1900 किलो हेरॉईल, 5500 किलो गांजा, 1700 किलो अफीम आणि अमलीपदार्थांच्या दोन कोटी गोळ्या पकडल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे म्हणणे आहे. तसेच या काळात 47 हजार तस्करांना पकडण्यात आल्याची आकडेवारी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com