थॉट ऑफ द वीक - भीती

Fear
Fear

आपण आजपर्यंतच्या या लेखमालेत स्वजागरूकतेमधील अडथळा असलेल्या ‘पूर्वग्रहा’ची माहिती घेतली. पूर्वग्रह, आपली  नाती, पालकत्व, निर्णयक्षमता व एकूणच आपल्या आयुष्यावर कसा परिणाम करतो व त्यावरचा उपाय हे आपण पाहिले. आपण हेही समजून घेतले की, ‘पूर्वग्रहविरहित आयुष्य’ म्हणजेच कोणत्याही प्रसंगाचा आपल्या भावविश्वावर होणारा परिणाम ‘जसा आहे तसा’ पाहणे व अनुभवणे, कोणताही ‘अर्थ व निष्कर्ष’ न लावता. हे खूप सोपे वाटते पण ते तितकेच अवघड आहे. स्वजागरूकतेचा मार्ग खूप आनंददायी आहे. तो घेण्यासाठी, आधी त्यातील अनेक अडथळे समजून घेणे व त्यावर मात करणे अधिक गरजेचे आहे. असाच एक अडथळा म्हणजे ‘भीती’ ती पुढील गोष्टींवर अवलंबून असते - १. प्रेम २. भीती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काही लोक त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या प्रेमामुळे काही कृती आणि निर्णय घेतात, तर काही लोक भीतीमुळे. ‘तुम्हाला कशाची भीती वाटते?’ असे विचारल्यावर मला खात्री आहे की, तुमच्याकडे लांबलचक यादी असेल. आपल्याला लहानपणी पहिल्यांदा आग दिसली की कुतूहल वाटते. चटका बसल्यानंतर भीती वाटते. कारण आगीला हात लावल्याचा परिणाम कळल्यानंतर भीती निर्माण होते, जी आपले संरक्षण करते, धोक्याबद्दल सजग करते आणि त्यास सामोरे जाण्यासाठी तयार करते.

भीती आपल्याला संभाव्य शक्यतांचे अंदाज बांधायला मदत करते. काहीवेळा भीतीपोटी आपण धोक्यापासून वाचतो देखील. मात्र, दुसऱ्या प्रकारची भीती असते ती म्हणजे ‘अंतर्मनातील भीती’. ती अनेक शक्यता निर्माण करत असते. भीती नकारात्मक शक्यताच बघते, त्यावेळी आपण जागरूक राहत नाही. आपले मन कायम भीतीमध्येच राहते.

भीतीचे अनेक उगम
1) पूर्वानुभव 

काही पूर्वानुभव भीती निर्माण करतात. घटना एकदाच घडलेली असते, परंतु ती परत तशीच घडेल व त्याचा परिणाम नकारात्मकच होईल, यामुळे भीती निर्माण होते. उदा. एकदा शिक्षणात खंड पडला की, आपण परत पुढे शिकू शकणार नाही ही भीती निर्माण होते.

2) वंशपरंपरागत भीती 
काही भीती आपल्या पालकांकडून वंशपरंपरागत आलेली असते. आपण एखादा वेगळा निर्णय घेतो. उदा. नोकरी सोडून व्यवसाय करणे. त्यावेळी पालकांच्या पूर्वानुभव व पूर्वग्रहामुळे नवीन विचार पडताळून त्यावर मार्गदर्शन करण्याआधीच ‘तुला जमणार नाही,’ ही भीती नकळत दिली जाते.

3) कालचक्रात अडकलेले मन 
आपण सतत भूतकाळ व भविष्यकाळात अडकतो, त्यावेळीही भीती निर्माण होते. कायम ‘पुढे काय होईल’ किंवा ‘आधी असे झाले होते’ याच विचारात सतत असल्याने मन भीती निर्माण करते.

4) स्वतःवरचा अविश्वास
हा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा. वरील सर्व कारणांमुळे आपला स्वतःवर अविश्वास निर्माण होतो. ‘मला कधीच जमणार नाही’, ‘माझी क्षमताच नाही’ असे पूर्वग्रह बनतात व त्यामुळे भीती निर्माण होते. यासारखी अनेक कारणे भीती निर्माण करतात. नक्की कोणकोणत्या भीती निर्माण होतात व त्यावर आपण कशी मात करायची हे आपण पुढील लेखात पाहू.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com