मस्त खा आणि हेल्दी राहा (वैदेही परशुरामी)

वैदेही परशुरामी
गुरुवार, 9 मे 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने "सेफ्टी झोन" वाचा "सकाळ पुणे टुडे"च्या "मैत्रीण" या पुरवणीत...

स्लीम फीट
मी रोज सकाळी वर्कआउट करते. सकाळी साडेसहा वाजता माझे ट्रेनिंग सुरू होते. मी जिम आणि योगासने या दोन्ही गोष्टी शक्‍यतो करते. त्याबरोबरच मी शास्त्रीय नृत्यही करते. मी नृत्य कलेलाही फिटनेसचा भाग समजते व गेल्या वीस वर्षांपासून नियमित नृत्य करते. आउटडोअर वर्कआउट करायला मला जास्त आवडतं. यात मी बिट ट्रेनिंगचे काही एक्‍सरसाईज करते. काही फंक्‍शनल ट्रेनिंगचे एक्‍सरसाईज करते. थोडा वेळ धावण्यासाठी देते. कधीतरी सायकलिंग करते. जिम वर्कआउटही करते, मात्र प्राधान्य आउटडोअरला देते. कधीतरी पॉवर योगाचादेखील माझ्या आउटडोअर ट्रेनिंगमध्ये समावेश असतो. मी लो-बॉडी एक्‍सरसाईज शक्‍यतो जास्त करते. अप्पर बॉडीमध्ये बायसेप, ट्रायसेपसारखे एक्‍सरसाईज करते. 

मी खूप जास्त फूडी आहे. फिट राहण्यासाठी पोषक आहारावर लक्ष केंद्रित करते, मात्र डाएट करत नाही. पोळी, भाजी, भात हे घरातलं जेवण मी रोज करते. जंक फूड शक्‍यतो टाळते. आठवड्यातला एक दिवस माझा ‘चीट डे’ असतो. त्या दिवशी मला आवडेल ते खाते. मी साधारण दिवसातून पाच वेळा तरी खाते. माझ्या शरीराला तशी आता सवयच झाली आहे. दिवसभरात तीन लिटर पाणी पिते. त्याचबरोबर सात ते आठ तासांची चांगली झोपदेखील शरीराला खूप गरजेची असते. तणाव घालवण्यासाठी मी धावण्याला प्राधान्य देते. वर्कआउट करणे, हे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे चित्रीकरण असले किंवा नसले तरी वर्कआउटसाठी वेळ काढतेच. मुळातच मी वीस वर्षं नृत्य करीत असल्याने माझ्यावर मला एखाद्या भूमिकेसाठी वजन कमी करण्याची किंवा वाढवायची गरज पडत नाही. नृत्यामुळे नेहमीच स्वतःला मेंटेन ठेवता आले आहे. वयाच्या सातव्या वर्षांपासून कथक शिकत असल्याने तेच माझे पहिले प्रेम आहे. मी कथकमध्ये मास्टर्स पदवी मिळवली आहे. बारीक होण्यासाठी वर्कआउट करा, मस्त खा आणि हेल्दी राहा, हाच माझा मंत्र आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article by Vaidehi Parshurami in Maitrin supplement of Sakal Pune Today