आनंद देणाऱ्या गोष्टींतून व्यायाम करा!

tapsee pannu
tapsee pannu

तुम्हाला फीट राहण्यासाठी दररोज उठून जीमलाच जाण्याची गरज नसते. तुम्हाला आनंद मिळू शकतो, अशा युक्‍त्याही तुम्ही तुमचा व्यायाम करण्यासाठी वापरू शकता. मला स्क्वॅश खेळायला आवडते, त्यामुळे प्रत्येकवेळी जिममध्ये जाऊन व्यायाम करण्यापेक्षा मी अर्धा तास स्क्वॅश खेळते. यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य देखील चांगले राहते. कधीतरी योगा करण्यालाही मी प्राधान्य देते.

मी खाण्याच्या बाबतीत कुठलेही नियमित डाएट प्लॅन फॉलो करत नाही. मी माझ्या रोजच्या आहारात विविध पोषक पदार्थांचा समावेश करीत असते. अर्थात, मी माझ्या आहारातून ग्लूटेन आणि लॅक्‍टोज काढून टाकले आहेत. मी पोळी, भात तसेच ब्रेडलादेखील पसंती देते. खरेतर मी भात जास्त खाते, जेणेकरून मला खूप कार्बोहायड्रेट्‌स मिळतील. तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असल्यास कार्बोहायड्रेट खाणे सोडा, हे मिथक आहे. त्यामुळेच कार्बोहायड्रेटही मिळतील असाही आहार मी घेते.

मी नियमित दुधाऐवजी बदामाचे दूध घेते. हे घेण्याचे कारण म्हणजे, दुधासारखेच पोषक घटक बदामाच्या दुधातदेखील असतात. परंतु तुलनेत या दुधात कमी कॅलरी व जास्त प्रथिने असतात. मी निरोगी राहण्यासाठी भरपूर पाणी पिते. ग्रीन टी नियमित घेते. यामुळे बेलीफॅट कमी होण्यासाठी मदत होते. वजन नियंत्रणात ठेवण्यामध्ये याची महत्त्वाची भूमिका असते.
मला एवढेच सांगायचे आहे, की आपल्याला हेल्दी राहायचे असल्यास कोणत्याही प्रकारचे डाएट घेण्याऐवजी पोषक आहार घ्या व तुम्हाला आवडेल त्याच पद्धतीने व्यायाम करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com