शहराचा (चेहरा) मोहरा (आश्विनी देशपांडे)

आश्विनी देशपांडे ashwini@elephantdesign.com
रविवार, 13 मे 2018

शहराचं किंवा देशाचं हेतुपुरस्सर ब्रॅंडिंग करण्यात अनेक फायदे होऊ शकतात. पर्यटन वाढून स्थानिक व्यवसायांना चालना मिळावी, त्यांना ऊर्जितावस्था यावी हा सर्वात लोकप्रिय उद्देश म्हणता येईल. योग्य ब्रॅंडद्वारे त्या परिसरातल्या जमिनीच्या मागणीत मोठी वाढ होण्याची शक्‍यता असते. नागरिकांत एकभाव निर्माण व्हावा, वाढावा हाही उद्देश शहरं, देश यांच्या ब्रॅंडिंगमागं असू शकतो. जर एखाद्या जागेचं ऐतिहासिक, सांस्कृतिक, भौगोलिक, वैचारिक वैशिष्ट्य आणि भविष्यकाळातली संभाव्य प्रगती, विविधता, नागरिकांच्या आशा-आकांक्षा विचारात घेऊन ब्रॅंड योजला तर तो यशस्वी होण्याची शक्‍यता नक्कीच वाढते.

शहराचं किंवा देशाचं हेतुपुरस्सर ब्रॅंडिंग करण्यात अनेक फायदे होऊ शकतात. पर्यटन वाढून स्थानिक व्यवसायांना चालना मिळावी, त्यांना ऊर्जितावस्था यावी हा सर्वात लोकप्रिय उद्देश म्हणता येईल. योग्य ब्रॅंडद्वारे त्या परिसरातल्या जमिनीच्या मागणीत मोठी वाढ होण्याची शक्‍यता असते. नागरिकांत एकभाव निर्माण व्हावा, वाढावा हाही उद्देश शहरं, देश यांच्या ब्रॅंडिंगमागं असू शकतो. जर एखाद्या जागेचं ऐतिहासिक, सांस्कृतिक, भौगोलिक, वैचारिक वैशिष्ट्य आणि भविष्यकाळातली संभाव्य प्रगती, विविधता, नागरिकांच्या आशा-आकांक्षा विचारात घेऊन ब्रॅंड योजला तर तो यशस्वी होण्याची शक्‍यता नक्कीच वाढते.

नाव, चेहरा, आवाज, अंगकाठी, व्यवसाय, विचार, आचार अशा अनेक पैलूंनी प्रत्येक व्यक्तीची ओळख घडत असते. व्यवसाय, उत्पादनं, सेवा यांचीही ओळख त्यांचं रंग-रूप, कार्यक्षमता, बोधचिन्ह, बोधवाक्‍य, जाहिरात अशा माध्यमांतून घडते. विशिष्ट विचार आणि अपेक्षित परिणाम ठरवून पद्धतशीरपणे उभी केलेली प्रतिमा म्हणजेच ब्रॅंड डिझाईन. यात डिझाइनचा आवाका केवळ दृश्‍यमाध्यमांद्वारे प्रतिमा तयार करणं असा नसून सर्वांगीण विचार करून सर्व माध्यमांत सहज व्यक्त होऊ शकेल अशा प्रतिमेचं काळजीपूर्वक नियोजन करणं असा विस्तारित असतो.

व्यवसाय, उत्पादनं, सेवा यांच्या पलीकडं जाऊन परिसर, गाव, शहर, प्रदेश अथवा देश यांचंही ब्रॅंडिंग केलं जातं. प्रसिद्ध स्मारकं किंवा संग्रहालयं, राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धा, सांस्कृतिक महोत्सव, नैसर्गिक सौंदर्य अशा त्या त्या जागेचा आगळेपणा सिद्ध करणाऱ्या गोष्टींतूनच ब्रॅंड उभा करता येतो. शहराचं किंवा देशाचं हेतुपुरस्सर ब्रॅंडिंग करण्यात अनेक फायदे होऊ शकतात. पर्यटन वाढून स्थानिक व्यवसायांना चालना मिळावी, त्यांना ऊर्जितावस्था यावी हा सर्वात लोकप्रिय उद्देश म्हणता येईल. तसंच आजकाल शिक्षण किंवा नोकरी-व्यवसायासाठी स्थलांतर करणं ही सामान्य बाब झालेली आहे. तेव्हा उत्तमोत्तम व्यक्तींना आकर्षित करून घेण्यासाठीही शहरं आपापल्या प्रतिमा भक्कम करायला पुढं सरसावली आहेत. योग्य ब्रॅंडद्वारे त्या परिसरातल्या जमिनीच्या मागणीत मोठी वाढ होण्याची शक्‍यता असते. नागरिकांत एकभाव निर्माण व्हावा, वाढावा हाही उद्देश शहरं, देश यांच्या ब्रॅंडिंगमागं असू शकतो. जर एखाद्या जागेचं ऐतिहासिक, सांस्कृतिक, भौगोलिक, वैचारिक वैशिष्ट्य आणि भविष्यकाळातली संभाव्य प्रगती, विविधता, नागरिकांच्या आशा-आकांक्षा विचारात घेऊन ब्रॅंड योजला तर तो यशस्वी होण्याची शक्‍यता नक्कीच वाढते.

चलनी नाणी, ध्वज, मोहोर, लेखी आणि बोली भाषा अशा प्रकारांतून आपल्या प्रदेशाची खास ओळख निर्माण करणं ही कृती राजे-महाराजे अनेक शतकांपासून करत आले असले तरी सरकारतर्फे हेतुपूर्ण, योजनाबद्ध ब्रॅंडिंग करण्याच्या घटना गेल्या 50 वर्षांतच बघायला मिळतात. न्यू यॉर्क, पॅरिस, जेरुसलेम, सिलिकॉन व्हॅली, लास वेगस अशा शहरांनी स्वतःची प्रतिमा विचारपूर्वक निर्माण केली आहे. यामुळं पर्यटक, उच्च शिक्षित मंडळी, व्यावसायिक, विद्यार्थी अशा अनेक गटांचा ओढा या शहरांकडं
असल्याचं सतत पाहायला मिळतं.

सन 1977 मध्ये न्यू यॉर्कच्या वाणिज्य खात्याचे डेप्युटी कमिशनर विल्यम डॉईल यांनी शहराच्या मार्केटिंगसाठी एका जाहिरात कंपनीला आमंत्रित केलं. "वेल्स रीच ग्रीन' या जाहिरात कंपनीनं त्या वेळी I love New York अशी स्लोगन वापरण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर डॉईल यांनी सुप्रसिद्ध ग्राफिक डिझायनर मिल्टन ग्लेजर यांना त्या स्लोगनला दृश्‍यस्वरूप देण्याची विनंती केली.

असं म्हणतात की मीटिंगला जात असताना टॅक्‍सीत बसून ग्लेजर यांनी एक स्केच केलं आणि तीच कल्पना डॉईल यांच्या पुढं सादर केली. केवळ दोन महिन्यांच्या कॅम्पेनसाठी कोणतंही मानधन न घेता तयार करण्यात आलेली ही कल्पना इतकी चित्तवेधक होती, की आज 40 वर्षांनंतरही ती तेवढीच टवटवीत आणि लोकप्रिय आहे. जगातल्या प्रत्येक देशात, भाषेत या कल्पनेची नक्कल झालेली आहे आणि तरीही मूळ कल्पना अजूनच दिमाखात प्रसार पावत आहे. त्या स्लोगनसोबत लिहिलेल्या ओळींतून जे गाणं तयार झालं होतं ते 1980 मध्ये शहराचं अधिकृत गीत म्हणून जाहीर करण्यात आलं आणि ते न्यू यॉर्कमध्ये आजही प्रचलित आहे. फ्रान्समध्ये 1889 मध्ये होणाऱ्या जागतिक मेळाव्यासाठी बांधण्यात आलेला आयफेल टॉवर हा मिनार 324 मीटर उंचीचा असून, आजच्या काळात रोज सुमारे 25 हजार पर्यटक या टॉवरला भेट देतात. त्यामुळेच पॅरिस शहराची ओळख आयफेल टॉवरशी दृढपणे जोडली गेलेली आहे, यात काहीच आश्‍चर्य नाही. सन 1961 मध्ये फ्रान्सच्या पर्यटन खात्यानं पॅरिस शहराच्या ब्रॅंडिंगचा उपक्रम केला. त्यात अर्थातच आयफेल टॉवर हा बोधचिन्हाचा महत्त्वाचा भाग होता. दोन-तीन वर्षांपूर्वी त्या बोधचिन्हाचा नव्यानं विचार करण्यासाठी ग्राफिन या पॅरिस-लियॉनस्थित कंपनीला आमंत्रित करण्यात आलं. या नवीन ब्रॅंडिंगमागची स्तुत्य कल्पना म्हणजे P A R I S या अक्षरांतच आयफेल टॉवर समाविष्ट करण्यात डिझाईन टीमला यश आलेलं आहे. अतिशय साधी-सोपी कल्पना; पण तितकीच चपखल. एकीकडं पॅरिससारखं मोठं शहर ऐतिहासिक स्मारकात आपली ओळख गुंफतं, तर तिथून जवळच ऍमस्टरडॅम या नेदरलॅंडच्या राजधानीचा ब्रॅंडिंगबाबतचा दृष्टिकोन अगदी वेगळा दिसतो. केसल्सक्रेमर या डच डिझाईन टीमनं ऍमस्टरडॅम या अत्यंत वैविध्यपूर्ण शहराची ओळख प्रत्येक नागरिकासोबत जोडण्याची कल्पना 2004 मध्ये मांडली. I am sterdam किंवा "-मीच ऍमस्टरडॅम' अशा सोप्या शाब्दिक कोटीनं नागरिकांना शहर आपलंसं वाटावं अशी योजना असावी. आपल्या शहराला एक बोधचिन्ह असावं, अशा कल्पनेनं 2005 च्या सुमारास आमच्या डिझाइन टीमनं पुण्याच्या स्फूर्तिस्थानांवर संशोधन सुरू केलं होतं. शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी तयार करण्यात आलेल्या मुद्रेपासून प्रेरणा घेऊन "पुणे' ही अक्षरं इंग्लिश आणि देवनागरीत एखाद्या शिक्‍क्‍यासारख्या वर्तुळात बसवून हे बोधचिन्ह आम्ही निश्‍चित केलं होतं. तेच चिन्ह पुढं 2008 च्या कॉमनवेल्थ यूथ गेम्सच्या बोधचिन्हाचाही अविभाज्य भाग बनलं होतं.

अगदी अलीकडच्या काळात Be U या बंगळुरू शहराच्या नावातून तयार झालेल्या ब्रॅंडिंगचं उदाहरण त्या शहराच्या वैविध्याचाच नमुना होय. ही कल्पना होती नम्मूर नावाच्या डिझाईन टीमची. वाढत्या चढाओढीत प्रत्येक शहराची स्वतःची ओळख असावी, हा विचार जास्तीत जास्त रुजत
जाणार हे नक्की.

(छायाचित्रं: निर्मात्यांच्या मालकीची)

Web Title: ashwini deshpande write article in saptarang