
अकरावा ‘टाटा स्टिल कोलकाता लिटररी मीट’ कोलकात्यातील व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलमध्ये २१ ते २६ जानेवारीदरम्यान भरला होता. यात १३० वक्त्यांची १०० सत्रे होती.
कोलकात्यातील दुसरी दुर्गापूजा!
- बालाजी विट्टल
अकरावा ‘टाटा स्टिल कोलकाता लिटररी मीट’ कोलकात्यातील व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलमध्ये २१ ते २६ जानेवारीदरम्यान भरला होता. यात १३० वक्त्यांची १०० सत्रे होती. त्यात भारत, श्रीलंका, अमेरिका, इटली, कोलम्बिया, ब्रिटन आणि इतर देशांतून निरीक्षक आले होते. व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलमध्ये, सोन-एट-लुमिएर हे सर्वात जास्त आसनक्षमता असलेले मुख्य ठिकाण होते. गेमप्लान स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या या जगविख्यात फेस्टचा हा खास रिपोर्ताज...
कोलकाता येथील रसेल स्ट्रिट आणि पार्ट स्ट्रिटजवळील १९ व्या शतकातील बंगाल क्लबमधील ‘सलून १७५ बँक्वेट हॉल’चे लॉन २५ जानेवारी २०२३ रोजीच्या आल्हाददायक संध्याकाळी उजळून निघाले होते. क्लबमधील रात्रीच्या जेवणाच्या पार्टीला उपस्थित असलेले ख्यातनाम प्रतिनिधी माझ्या नजरेसमोर होते. ‘‘आज नाबामी नाबामी भाब, ताइ ना?’’ (आज नाबामीसारखे वाटत आहे, नाही का?) गेमप्लान स्पोर्ट्स प्रा.लि.च्या संचालक मालविका बॅनर्जी म्हणाल्या. ही संस्था कोलकात्यात दरवर्षी साहित्यिक मेळावा घेत असते. ‘नाबामी नाबामी भाब’ या शब्दाचा संबंध महानवमीच्या दिवशी वाटणाऱ्या हूरहुरीशी आहे. हा वार्षिक दुर्गापूजेच्या आदला दिवस असतो. त्याचप्रमाणे कोलकाता साहित्यिक मेळावा २०२३ (कोलकाता लिटररी मीट)चा दुसऱ्या दिवशी समारोप होणार होता.
अकरावा ‘टाटा स्टिल कोलकाता लिटररी मिट’ कोलकत्यातील व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलमध्ये २१ ते २६ जानेवारीदरम्यान भरला होता. यात १३० वक्त्यांची १०० सत्रे होती. त्यात भारत, श्रीलंका, अमेरिका, इटली, कोलम्बिया, ब्रिटन आणि इतर देशांतून निरीक्षक आले होते. व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलमध्ये, सोन-एट-लुमिएर हे सर्वात जास्त आसनक्षमता असलेले मुख्य ठिकाण होते. येथील पश्चिमेकडील चौकात आणि पूर्वेकडील कलाम लॉन्सवर अनेक कार्यक्रम होते. कादंबरीकार, ललितेतर लेखक, आत्मचरित्रकार, पत्रकार, प्रेरणादायी वक्ते, संपादक, भाषांतरकार, संशोधक, गायक आणि संगीतकार, साहित्य सल्लागार, नर्तक, सिने कलावंत, शिक्षण क्षेत्रातील विद्वान, मानववंशशास्त्रज्ञ, पुराणवस्तू संशोधक, कवी आणि गीतकार, वैद्यकीय व्यावसायिक, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, उद्योगपती, रेडिओ जॉकी, क्वीज मास्टर्स, राजकीय व्यक्ती या सर्वांच्या सोबतीने तिथे उपस्थित असणे हा मोठा सन्मान वाटत होता. पण, या सर्व प्रतिनिधींना भेटण्यासाठी पाच दिवस अपुरे होते. तथापी, संमेलनाची रचना आणि कालावधी औपचारिक आणि अनौपचारिक चर्चांसाठी प्रदान करण्यात आलेला होता. ज्यामध्ये सर्वोत्तम म्हणजे सन एट ल्युमिएरशेजारी असलेले लेखकांचे विश्रामगृह.

अनेक मोहक सत्रांची मालिकाच होती. उदाहरणार्थ बंगाली साहित्यिक बिभुतीभूषण बंदोपाध्याय यांना अभिवादन करण्यासाठीचा कार्यक्रम. दुसऱ्या सत्रात दिग्गज शंकर आणि शिरशेंदू मुखोपाध्याय यांनी स्वातंत्र्याच्या पहिल्या क्षणांचे चित्र उभे केले. ‘धवानी और गूँज से रेझोनन्स तक’ आणि ‘हिंदी साहित्य का शहर कोलकाता’ हे पूनम शर्मा, डेझी रॉकवेल, रचना यादव आणि अलका सरोगी यांचे हिंदी सत्र पार पडले. पुस्तकांचे लोकार्पण, क्राईम फिक्शनवर चर्चा, कवितांची पुस्तके, क्रीडा पुस्तके, संगीतमय चरित्रे, सेलिब्रिटींच्या आठवणी, रोमँटिक कादंबऱ्या, पाककला, वनसंवर्धन, सजग जीवनाच्या सद्गुणांवरील स्वयंसहाय्य पुस्तके, पारशी लोकांचा अज्ञात इतिहास, आंतरराष्ट्रीय राजकारण, ज्यू आणि अँग्लो इंडियन्स, साथीच्या रोगांचे विश्लेषण, एआय आणि चीनशी संघर्ष, ‘बज गई सिटी’सारख्या लघुपटांचे प्रदर्शन... यांसारखी सत्रे दुसऱ्या हुगळीच्या पुलाइतकीच विस्तृत होती.
आपण एकाच वेळी दोन सत्रांना उपस्थित राहू शकत नाही, मालविका बॅनर्जी सांगत होत्या. खरोखरच आपण पुस्तकाभिमुख होत आहोत. आम्ही साहित्याला एक अलिप्त जागा म्हणून पाहत नाही. त्यामुळे सिनेमा, कला आणि संगीत हे यात मिसळते आणि याची गोडी वाढते. त्या पुढे म्हणाल्या, या गोडीने रोजची संध्याकाळ मधुर केली. २१ जानेवारीला ओपेरा स्टार सोप्रनो पाओलेट्टा मरोक्कू आणि पियानो वादक लुईसा प्रेयर यांनी रवींद्रनाथ टागोर आणि गॅब्रिएल डी अन्न्युनझीओ यांच्या कवितांवर आधारित गाणी सादर केली. सुदिप्तो भौमिक यांनी लिहिलेले आणि सुमन मुखोपाध्याय यांनी दिग्दर्शित केलेले ‘शिखंडी’ नाटक सुदिप्तो मुजुमदार यांनी २२ जानेवारी रोजी सादर केले. २४ जानेवारी रोजी ‘शक्ती - फिफ्टीन्थ इंडिया टूर’चे आयोजन कलकाता क्रिकेट अँड फूटबॉल ग्राऊंडवर करण्यात आले होते. त्याच दिवशी सन एट ल्युमिएरमध्ये उस्ताद झाकीर हुसैन, जॉन मॅकलॉफ्लीन, व्ही. सेल्वगणेश, शंकर महादेवन आणि गणेश राजागोपालन यांचे विशेष सत्र होते.
मालविका बॅनर्जी म्हणाल्या की, ‘आम्हाला प्रत्येक वर्षी ४० ते ४५ हजार प्रेक्षक लाभतात; पण प्रेक्षकांची संख्या, मोठी नावे किंवा पुरस्कार विजेते यांच्यावरून आम्ही उत्सवाची गुणवत्ता ठरवत नाही. आम्ही आमचा लौकिक जपला आहे आणि पुस्तकप्रेमी शहर म्हणून कोलकात्याचा नावलौकिक त्यापेक्षा चांगला आहे. आम्ही नोबेल पारितोषिक विजेत्याप्रमाणेच दूरच्या गावातील नवख्या लेखकालाही मान देतो. या उत्सवाची ओळख आम्हाला मोठा उत्सव म्हणून नाही, तर महत्त्वाचा आणि लोकांना आवडणारा उत्सव म्हणून करायची आहे. लोक येतात, पण आम्ही संख्येमागे धावत नाही.’
कोलकत्यातील साहित्य मेळाव्याचा इतिहास काय आहे? बॅनर्जी सांगतात, ‘‘मी २०१० ला प्रेक्षक म्हणून जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये उपस्थित होते. तेव्हा मला वाटले की कोलकात्यातही एक दर्जेदार साहित्य मेळा असायला हवा. २०१२ हे आमचे पहिले वर्ष होते. दोन वर्षे कोलकाता बुक फेअरसोबत आम्ही कार्यक्रम घेतला. त्यानंतर गेमप्लॅन स्पोर्ट्सने व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलशी संपर्क साधला. त्यांनी या मेळाव्यात भागीदार होणे मान्य केले. जगभरात सांस्कृतिक अवकाश सक्रिय असणे आणि संस्कृती साजरी करणे आवश्यक असते हे त्यांना पटले होते. याप्रकारे कोलकाता लिटररी मिटला त्याचे स्वतःचे ठिकाण मिळाले. आमचे नशीब स्वतःच लिहिण्याच्या आम्ही तयारीत होतो.
यामुळे उत्सवाचा दर्जा उंचावला आणि ते सहजसाध्य झाले. २०१४ मध्ये टाटा स्टिलने सहयोगी प्रायोजक बनण्याचा निर्णय घेतला तेव्हा ‘लिट मीट’ला आणखी चालना मिळाली. त्यांना फेस्टिव्हलची व्याप्ती आणि छटा आवडली. लेखक आणि प्रेक्षकांमध्ये मिळत असलेला प्रतिसाद त्यांच्या लक्षात आला. त्यांनी शीर्षक प्रायोजक होण्याचे ठरवले आणि त्यानंतर भुवनेश्वर (२०१६) व रांचीमध्ये (२०१७) उत्सव सुरू झाले.’
मेळाव्यादरम्यान रात्रीचे जेवण टाटा स्टिलचे मार्केटिंग मुख्यालय असलेल्या टाटा सेंटरच्या छतावर होते. व्हिक्टोरिया मेमोरिअल दिव्यांनी न्हाऊन निघाले होते, कारच्या हेडलाइट्सने शहराच्या चौरंगी मार्गाची लांबी जास्तच पसरली होती, चित्रपट किंवा कादंबरीतील पार्श्वभूमीप्रमाणे. चौरंगी कोलकात्यातील आठवणींपासून विभक्त करता येणार नाही. गेमप्लानच्या अत्यंत प्रेरक टीमचे आभार.
मालविका म्हणाल्या, ‘कोलकाता लिटररी मीटची स्पर्धा स्वतःशीच आहे. ते वाढत आहे कारण, लेखकांना वाटते की या व्यासपीठावर व्यर्थ गप्पांपेक्षा संवादाला महत्त्व आहे. आमचे कार्यक्रम आणि व्यवहार यात प्रामाणिकपणा आणि बुद्धिमत्ता आहे, याचा त्यांना विश्वास आहे. गेमप्लॅन टीम उत्स्फूर्तपणे वाचन करते आणि प्रकाशक महत्त्वाच्या प्रकाशनाकडे लक्ष वेधून मदत करतात.’ आणि मग पुढे काय? ‘हा मेळावा नेईल तिकडे मी जाईन. यापुढे आमच्या टीमने काय करायला हवे नियतीच ठरवेल.’ पण, सध्या तरी ‘टाटा स्टिल कोलकता लिटररी मीट’ ही कोलकात्यातील दुसरी दुर्गा पूजा झाली आहे.
(लेखक ख्यातनाम लेखक आहेत.)