ऐतिहासिक ‘बीड’पुराण!

प्राचीन दुर्गावतीनगर किंवा चंपावतीनगर म्हणून ओळखले जाणारे बीड शहर, पौराणिक इतिहास, व्युत्पत्ती आणि कंकालेश्वर मंदिरासारख्या वास्तूंमुळे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध आहे.
Beed History
Beed History Sakal
Updated on

ओंकार वर्तले - ovartale@gmail.com

मराठवाड्यातील बीड जिल्ह्याचे अनेक प्राचीन संदर्भ आपल्याला प्राचीन कागदपत्रांत सापडतात. काही इतिहास अभ्यासकांच्या मते आजच्या बीडला पांडवकाळात ‘दुर्गावतीनगर’ म्हणत असत. पुढे चालुक्यकालीन चंपावतीराणीच्या नावावरून देण्यात आलेले ‘चंपावतीनगर’ हे या शहराचे दुसरे नाव होते. पूर्वी राणी चंपावतीने या भागावर राज्य केल्याचा उल्लेख काही पुराणांमध्ये सापडतो, असे अभ्यासक सांगतात. बालाघाट डोंगरांच्या पायथ्याशी बिंदुसरा नदीच्या खोऱ्यात खळग्यासारख्या किंवा बिळासारख्या ठिकाणी हे शहर वसले असल्याने ‘बीळ’ या शब्दाच्या अपभ्रंशातून ‘बीड’ हे नाव पडले असावे, अशीदेखील ‘बीड’ नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. या बीडमध्ये दोन मंदिरे पाहण्यासारखी आहेत. यामध्ये एक नाव म्हणजे कंकालेश्वर या शिवमंदिराचे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com