मुंबईकरांना साद घालणारे मॉन्सुन ट्रेक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 July 2019

ठाणे, रायगड जिल्ह्यांतील किल्ले, पर्यटन स्थळे मुंबईकरांना सदोदित साद घालत असतात. तेथील जैवविविधता विलक्षण आहे...

ठाणे, रायगड जिल्ह्यांतील किल्ले, पर्यटन स्थळे मुंबईकरांना सदोदित साद घालत असतात. तेथील जैवविविधता विलक्षण आहे...

जिल्हा नगर : हरिश्‍चंद्र गड 
    निसर्गसौंदर्याने नटलेला हरिश्‍चंद्रगड ‘ट्रेकर्सची पंढरी’ म्हणून प्रसिद्ध आहे. 
    करवंद, कारवीच्या जाळी, धायटी, उक्षी, मदवेल, कुडा, पांगळी, हेकळ, गारवेल इ. वनस्पती आढळतात.
    तारामती या सर्वोच्च शिखरावरून नाणेघाट, रतनगड, कात्राबाईची खिंड, आजोबाचा डोंगर, कळसूबाई, भैरवगड, हडसर परिसराचे दर्शन. 
    गडावरील मंदिर, तारामती कडा, कुंड, नक्षीकाम पाहण्यासारखे.

माहुली गड 
    आसनगावजवळचा (ता. शहापूर, जि. ठाणे) माहुली हा मुघलकालीन किल्ला. 
    पायथ्याचे प्राचीन गणेश मंदिर, किल्ल्यावरचा महादरवाजा, गुहा, किल्ल्यावरील शिवाजी महाराज यांची मूर्ती, प्राचीन शिवमंदिर, कल्याण दरवाजा, हनुमान दरवाजा, खिंड तसेच अनेक प्राचीन शिल्प.
    माहुली चंदेरी, भंडारगड, माहुली आणि पळसगड हे मिळून हा किल्ला आहे.

सिद्धगड 
    मुरबाड ते म्हसा आणि येथून २१ किलोमीटरवरील सिद्धगड परिसर हा भीमाशंभर अभयारण्यात येतो.
    सिद्धगड किंवा ‘वॅलर किल्ला’ ही अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा भाग आहे. 
    हा किल्ला ट्रेकरमध्ये लोकप्रिय 
    बौद्धकालीन लेणी, वाड्यांचे अवशेष, सैनिकांच्या बराकी, धान्याची कोठारे, पाण्याची टाकी. उंची : ९८२ फूट. 

जिल्हा रायगड : कर्नाळा किल्ला
    पक्षी प्रेमींचे आवडते ठिकाण. कर्नाळा किल्ल्याला ट्रेकर्सची पसंती.
    महाराष्ट्रातील सर्वांत सुंदर किल्ल्यांपैकी एक. मुंबईजवळ ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाण.
    मॉन्सूनच्या हंगामात पक्ष्यांच्या विविध प्रजाती दिसतात. 

शिवथर घळ 
    महाडपासून ३० किलोमीटरवरील घळ. 
    सर्व बाजूंनी उंच उंच डोंगर, वाघजई दरीच्या कुशीतील ठिकाण. 
    काळ नदीचा उगम याच परिसरात. तिच्या काठावर कुंभे कसबे व आंबे अशा तीन शिवथर वस्त्या आहेत. 
    मुंबई-गोवा महामार्गावर महाडच्या पुढे नदीवरील पूल लागतो. पुढे वरंध घाटाचा फाटा लागतो. या रस्त्याने भोरच्या दिशेला पुढे शिवथर घळ ३० किलोमीटर आहे.  

रायगड  
    रोपवेने सहज किल्ल्याच्या माथ्यावर पोचता येते; पण हौसी ट्रेकर्स किल्ला पायी चढण्याचाच जास्त प्रयत्न करतात.
    महाडपासून २६ किलोमीटरवर

माथेरान
    मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सर्वांत जवळचे ठिकाण. 
    पावसाळी पर्यटनाची मजा लुटण्यासाठी येथे पर्यटक येतात. 
    संपूर्ण माथा घनदाट झाडी आणि लाल पायवाटांनी भरलेला आहे. 
    वन ट्री हिल पॉइंट, गार्बट पॉइंट अशा ठिकाणावरून ट्रेकिंगचा थरार लुटता येतो.
(संकलन - शर्मिला वाळुंज, ठाणे; महेंद्र दुसार, अलिबाग)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Best Places for Monsoon trek near Mumbai