ढिंग टांग :योगमूलक कर्मयोग!

अहमदाबादेतील विस्तीर्ण पटांगणात होणाऱ्या भव्य योगमहोत्सवाच्या रंगीत तालमीसाठी आम्ही योगगुरु पू. बाबाजी यांच्या चरणारविंदी मिलिंदायमान झालो, तेव्हाच औंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिवस थाटामाटात साजरा होणार
British Nandi writes Yoga Festival  agnipath scheme protest inflation modi government
British Nandi writes Yoga Festival agnipath scheme protest inflation modi governmentsakal

अहमदाबादेतील विस्तीर्ण पटांगणात होणाऱ्या भव्य योगमहोत्सवाच्या रंगीत तालमीसाठी आम्ही योगगुरु पू. बाबाजी यांच्या चरणारविंदी मिलिंदायमान झालो, तेव्हाच औंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिवस थाटामाटात साजरा होणार याची चुणूक मिळाली. योगाभ्यासासंबंधी आमच्या मनात काही मूलभूत शंकाकुशंका होत्या, त्याचे निरसन करुन घेण्यासाठीच आम्ही तेथे गेलो. वातावरणात उत्साह होता. पू. बाबाजींनी जागच्या जागी कुदत कानमंत्र दिला : ‘‘निवृत्ती मूलक अभ्युदय, प्रार्थना मूलक पुरुषार्थ और योग मूलक कर्मयोग, यही तो जीवन का सारतत्त्व है…’

…तेव्हा नेमका आम्ही (श्वास ओढून) पोट आत खेचले होते. एवढ्या मोठ्या सारतत्त्वामुळे आमच्या डोळ्यासमोर काजवे चमकले, थोडकी अंधारी आली आणि बध्दपद्मासनातच तसेच्या तसे चटईवर आडवे का न व्हावे, हा विचारयोग मनात तरळून गेला…(हे बध्दपद्मासनाचे कलम योगाभ्यासातून रद्द करायला हवे. पायाच्या कागदासारख्या घड्या घालून कोणाचे भले झाले आहे?) योगमूलक कर्मयोग? ही भानगड जरा समजून घ्यायला हवी. निवृत्ती मूलक अभ्युदय आणि प्रार्थना मूलक पुरुषार्थ या दोन गोष्टी समजायला सोप्या आहेत. ते तर शाळकरी मुलालाही कळेल. पण योगमूलक कर्मयोग ही एक कर्मकठीण गोष्ट आहे, हे आम्ही अनुभवाने सांगू. नुसता कर्मयोग समजणे हीदेखील काही फार अवघड गोष्ट नाही. पण ते योगमूलक नसेल, तर काहीही उपयोग नाही, याची नोंद घ्यावी. ज्या कर्मयोगाच्या मुळाशी योग आहे, तो योगमूलक कर्मयोग!

आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या शुभमुहूर्तावर योगा (तरी) रेग्युलर सुरु करावा, असा सुसंकल्प आम्ही सोडला होता. उष्ट्रासन, भुजंगासन आणि पश्चिमोत्तानासनासह एकंदर (फक्त) सहा योगासने केली तर वजन झराझरा घटेल, असे आम्हाला पू. बाबाजींनीच सांगितले होते. योगासनांचे आणि आमचे तसे काही वाकडे नाही, परंतु, सगळ्याची सुरवात बध्दपद्मासनापासून करण्याला आमचा देहिक विरोध आहे, हे वर सांगितलेच. ‘‘योग मानवता के लिए करना आवश्यक है, हमारे प्रधानमंत्री प्रति दिन सवेरे शीघ्र उठकर योगाभ्यास करते है, फिर देशकार्य को जुट जाते है, समझे?’’ पू. बाबाजींनी उदाहरणासहित योगासनांचे महत्त्व समजावले, जे आम्हाला आधीच पटले आहे.

मानवता वगैरे ठीक आहे, पण ‘प्रतिदिन सवेरे शीघ्र उठना’ आणि त्यानंतर ‘योगाभ्यास करना’ या दोन क्रियांना आमचा देहिक आक्षेप आहे!! ‘‘योगासने झोपेत केलेली चालतात का?’’ हा आमचा पहिला सवाल होता. ‘‘निद्रा में योग संभव है, किंतु उसके लिए आपको बहुत कठोर योगसाधना करनी पडेगी! उदाहणार्थ, इस समय मैं निद्रा मेंही हूं, और तुम्हे योगाभ्यास सिखा रहा हूं,’’ सस्मित मुद्रेने पू. बाबाजींनी आपले गुपित सांगितले. आम्ही च्याट! ‘‘इतनाही नहीं, हमारे प्रधानमंत्री तो निद्रा में योगाभ्यास करने के पश्चात निद्रामेंही कार्य में व्यस्त हो जाते है...,’’ पू. बाबाजींनी पुन्हा ठासून सांगितले. आम्ही कम्प्लीट च्याटंच्याट!

‘‘योगासने रिकाम्यापोटी करावीत की भरल्यापोटी?,’’ ही आमची दुसरी शंका होती. ‘‘योगाभ्याससे पाचन सुलभ होता है..’’ ते म्हणाले. सुलभ वगैरे ऐकून आम्ही विषयच बदलला. ‘‘तरुणांनी योगपथावर चालावे की अग्निपथावर?,’’ आमचा तिसरा प्रश्न बंकरमधून गोळी सुटल्यागत गेला.

…त्यावर पू. बाबाजींनी डोळे मिटले आणि प्राणायाम सुरु केला. मग आम्हीही रिकाम्यापोटी सर्व चिंता विसरुन डोळे मिटले. हाच तो योगमूलक कर्मयोग!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com