माऊथ पब्लिसिटीवर बहरला व्यवसाय...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 September 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

घरच्या घरी - सुजाता भिंगारे
मला कलाकुसरीचे दागिने बनवण्याची आवड होती. त्यामुळे मी माझ्या बहिणीला साताऱ्याला हे काम सुरू करून दिले. त्याला लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला, म्हणून मी स्वतः हा व्यवसाय करायला सुरवात केली. मी गेल्या १५ वर्षांपासून या व्यवसायात आहे.  मी सोनल हॉलला माझा एक कायमस्वरूपी स्टॉल लावते. यामध्ये विविध ग्राहक माझ्याकडून दागिने घेऊन जातात आणि काही जण आवर्जून ‘तुमचे दागिने चांगले निघाले,’ हे सांगायलाही येतात. मी दोन प्रकारचे दागिने बनवते; हॅण्डमेड आणि मशीनमेड. हॅण्डमेडपेक्षा मशीनमेडच्या दागिन्यांना फिनिशिंग चांगली असते. त्यावर बसवलेले खडे पक्के बसतात आणि निघतही नाहीत. हॅण्डमेडच्या बाबतीत मात्र खडे पडण्याची थोडी शक्यता असते. त्यामुळे माझ्याकडील मशीनमेड दागिन्यांना सर्वाधिक पसंती असते. मंगळसूत्राचे विविध प्रकार, कुडी, बोरमाळ असे अनेक दागिन्यांचे प्रकार करते. पाण्यात वापरता येतील, अशा बांगड्याही मी बनवते. आताच्या ट्रेंडप्रमाणे फॅन्सी ज्वेलरी बनवण्याकडे माझा कल असतो. माझ्या डायमंडच्या ब्रेसलेटला सर्वाधिक मागणी आहे. यासाठी मी कुठेही जाहिरात करीत नाही, मात्र माऊथ पब्लिसिटीवर माझा व्यवसाय बहरला आहे. एका ग्राहकाला तुम्ही दर्जेदार माल दिलात, तर तो त्यासोबतच आणखी चार ग्राहक घेऊन येतो. या माझ्या सगळ्या व्यवसायात घर आणि व्यवसाय सांभाळणे ही एक कसरतच आहे. मात्र यामध्ये मला माझ्या पतींचा पूर्ण पाठिंबा मिळतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Business Women Sujata Bhingare maitrin supplement sakal pune today