#ManOnMoon50th : चंद्रावर पाऊल ठेवणारा हा आहे दुसरा मानव!

अमित गोळवलकर
शनिवार, 20 जुलै 2019

अपोलो 11 मोहिमेद्वारे चंद्रावर पाऊल ठेवणारा दुसरा मानव. चंद्राच्या पृष्ठभागाची जी छायाचित्रे आज प्रसिद्ध आहेत त्यापैकी बहुतांश छायाचित्रे बझ आल्ड्रिन यांनी काढलेली आहेत.

बझ आल्ड्रिन 

अपोलो 11 मोहिमेद्वारे चंद्रावर पाऊल ठेवणारा दुसरा मानव. चंद्राच्या पृष्ठभागाची जी छायाचित्रे आज प्रसिद्ध आहेत त्यापैकी बहुतांश छायाचित्रे बझ आल्ड्रिन यांनी काढलेली आहेत.

buzz

चंद्रावर पहिले पाऊल ठेवण्याचा मान आल्ड्रिन यांना मिळाला नसला तरी चंद्रावर धार्मिक विधी करणारी पहिली व्यक्ती ही बझ आल्ड्रिन हीच आहे. 'कम्युनियन' असे या विधीचे नाव आहे. चंद्रावर शिंपडले गेलेले पहिले पाणी आणि सेवन केलेल्या अन्नाचा पहिला घास हा या कम्युनियनचा प्रसाद होता, असे बझ आल्ड्रिन यांनी नंतर सांगितले. अर्थात अनेक वर्षे आपण हा विधी केल्याचे आल्ड्रिन यांनी कुणाला सांगितले नव्हते.

आपल्याला चंद्रावर पहिले पाऊल ठेवण्याचा मान मिळणार नाही, हे मोहिमेच्या सुरुवातीपासून आल्ड्रिन यांना माहित होते. ही खंत त्यांच्या मनात अखेरपर्यंत राहिली. हे सारे त्यांनी उतरवले आहे आपल्या आत्मचरित्रात... 
या आत्मचरित्राचे नाव आहे - 'द मॅग्निफिशण्ट डिसोलेशन- द लाँग जर्नी होम फ्राॅम द मून'

buzz


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Buzz Aldrin was the second person who touches the moon