प्रेग्नन्सीनंतर वजन केले कमी

Shilpa-Shetty
Shilpa-Shetty

स्लिम फिट - शिल्पा शेट्टी, अभिनेत्री
प्रेग्नन्सीनंतर माझे वजन खूप वाढले होते. ते वेळेत कमी करण्याचे आव्हान माझ्यासमोर होते. घरात लहान मूल असले, की त्याच्याजवळ सतत उपलब्ध असणे गरजेचे असते. पण अशावेळी माझ्या शरीराकडेही दुर्लक्ष करून चालणार नव्हते. त्यामुळे मी मुलगा झोपला, की दुपारच्या वेळी व्यायाम करायला सुरवात केली. सुरवातीला चालणे, सायकलिंग असे प्रकार चालू केले. या माझ्या जिद्दीमुळे मी प्रेग्नन्सीनंतर केवळ १० महिन्यांतच २० किलो वजन कमी केले. 

शरीर फिट ठेवायचे असल्यास तुम्हाला तेवढी मेहनत करणे गरजेचे असते. त्या मेहनतीत सातत्य असणेही तितकेच महत्त्वाचे असते. योग्य मार्गदर्शन, योग्य आहार आणि योग्य मेहनत तुम्हाला निरोगी शरीर मिळवून देऊ शकते. मला दिवसातील जास्तीत जास्त वेळ हा शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी द्यायला आवडतो. प्रेग्नन्सीनंतर मी जे वजन करण्यासाठी मोठी मेहनत घेतली. मी हे वजन नैसर्गिकरीत्या कमी केले. माझ्या आयुष्यात योगासनांना खूप महत्त्व आहे. मनाला शांत ठेवण्यासाठी मी ध्यानधारणेला महत्त्व देते. योगा आणि ध्यान यांमुळे तुम्ही निरोगीही होता आणि शांतही होता. 

तुम्ही व्यायाम करत असता तेव्हा तंदुरुस्त आहार घेणेही गरजेचे असते. यासाठी मी बॅलेन्स्ड डाएट घेते. यामध्ये साधारण ब्राऊन राइस, ब्राऊन ब्रेड, ब्राऊन शुगर, ऑलिव्ह ऑइलमध्ये बनवलेल्या भाज्या असा आहार घेते. सकाळी मी आवळा किंवा कोरफडीचा ज्यूस घेते. त्यासोबतच ब्राऊन शुगर घातलेला चहा घेते. दुपारच्या जेवणात ब्राऊन राइस, चपाती, जास्त फायबर असलेली डाळ, चिकन, भाज्या घेते. संध्याकाळच्या नाश्‍त्याला एक ब्राऊन ब्रेड टोस्ट, एक अंडे आणि ग्रीन टी घेते. रात्रीच्या जेवणात सलाड, सूप आणि चिकन घेते. रात्रीचे जेवण नेहमी आठ वाजता घेते. 

मला मानेचा त्रास असल्याने डॉक्‍टरांनी योगा करण्याचा सल्ला दिला होता. तेव्हापासून मी योगा करते. अष्टांग योगा हा आवडता प्रकार आहे. वर्कआउटसाठी मी आठवड्याचे दिवस विभागले आहेत. दोन दिवस योगा, प्राणायाम आणि ध्यान करते. एक्‍सरसाइज दोन दिवस, एक दिवस कार्डिओ, आणि वेट लिफ्टिंगसारखे प्रकार एक दिवस करते. त्वचा चांगली राहण्यासाठी दिवसभर किमान १० ग्लास तरी पाणी पिते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com