‘पिंक’मधून मिळाला नावलौकिक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

सेलिब्रिटी टॉक - तापसी पन्नू, अभिनेत्री
अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी मी एक मॉडेल आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर होते. दिल्लीमधून इंजिनिअरिंगच शिक्षण घेतल्यानंतर मी मॉडेलिंग सुरू केलं. ‘व्ही’ वाहिनीवर ‘गेट गॉर्जेस’ या कार्यक्रमासाठी मी ऑडिशन दिली होती आणि त्यात माझी निवड झाली.

सेलिब्रिटी टॉक - तापसी पन्नू, अभिनेत्री
अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी मी एक मॉडेल आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर होते. दिल्लीमधून इंजिनिअरिंगच शिक्षण घेतल्यानंतर मी मॉडेलिंग सुरू केलं. ‘व्ही’ वाहिनीवर ‘गेट गॉर्जेस’ या कार्यक्रमासाठी मी ऑडिशन दिली होती आणि त्यात माझी निवड झाली. त्यानंतर मॉडेल म्हणून बऱ्याच ब्रॅण्डसाठी कामही केलं. मी २०१०मध्ये माझा पहिला तेलगू चित्रपट ‘झुम्म्णडी नादाम’मधून पदार्पण केलं. ‘आदुकलम’ हा तमीळ चित्रपट २०११मध्ये केला. मी अशा अनेक दाक्षिणात्य चित्रपटांतून काम केलं.

त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करून अनेक चित्रपट केले, पण २०१६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पिंक’ चित्रपटातून मला खरा नावलौकिक मिळाला. ‘पिंक’मध्ये मी ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केलं. ‘पिंक’नंतर अनेक चांगल्या चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. ‘पिंक’, ‘नाम शबाना’, ‘जुडवा२’सारख्या चित्रपटांत भूमिका साकारल्यानं माझा अभिनयाबद्दलचा आत्मविश्‍वास वाढला. लोकांना मला वेगवेगळ्या भूमिकांत पाहायला आवडतं, हे मला जाणवलं. मी हिंदी चित्रपटसृष्टीत गेली पाच वर्षं काम करीत आहे आणि इतक्‍या कमी वेळात मला चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारायला मिळत आहे, हे माझं भाग्यच आहे. मी २०१८मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या स्क्रिप्ट निवडल्या होत्या. प्रेक्षकांना काय आवडतं, हे मला कळायला लागलं व त्यामुळे माझा आत्मविश्‍वास आणखी वाढला. आता मी माझ्या स्क्रिप्ट स्वतः निवडते. त्यासाठी मी कोणालाही विचारत नाही. बड्या अभिनेत्यांबरोबर मी काम केलं व त्यांनी माझ्यावर त्यांनी कधीच दबाव आणला नाही. ‘पिंक’ आणि ‘बदला’ या चित्रपटात मी अमिताभ सरांबरोबर काम करत होते, तरीही त्यांना ‘दी अमिताभ बच्चन’ न समजता मी त्यांना माझे को-स्टार समजूनच काम केलं.

स्वतःला दबावात ठेवून काम केलं असतं, तर मी चांगलं काम करू शकले नसते. अमिताभ सरांबरोबर काम करताना खूपच मजा आली. त्यांच्याबरोबर काम करताना आणखी जास्त चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही मी दरवर्षी एक चित्रपट करते. या वर्षीसुद्धा ‘गेम ओव्हर’ हा दाक्षिणात्य चित्रपट केला. मला दाक्षिणात्य आणि हिंदी असे दोन्हीही सिनेमे करायला आवडतात. स्क्रिप्ट आवडली की, मी दोन्हींमध्ये काम करते. मी एक अभिनेत्री आहे आणि मला अजून खूप काम करायचं आहे, जेणेकरून लोक माझं नाव ऐकून माझे चित्रपट पाहायला येतील...

Web Title: celebrity talk taapsee pannu maitrin supplement sakal pune today