दगडांच्या देशा : साईबाबांच्या सेवेची संधी

K C Pande with Sharad Pawar
K C Pande with Sharad Pawaresakal

लेखक : के. सी. पांडे


साईबाबांच्या (Sai baba) दर्शनाने मिळणारी सकारात्मक ऊर्जा (Positive energy) ही प्रचंड उत्साहवर्धक असते. तुम्हाला चांगले काम करण्याची निरंतर प्रेरणा देणारी ही ऊर्जा जीवनातील अनेक प्रसंगांना धीरोदात्तपणे तोंड देण्यास कामी येते. यामुळेच साईबाबांची सेवा करण्याची संधी मिळावी, असी मी मनोमन इच्छा प्रदर्शित केली अन् काही काळाने ती पूर्णही झाली. संस्थानच्या विश्‍वस्तपदाच्या माध्यमातून मी भक्तांसाठी अनेक लोकसेवेची कामे केली, याचे मला समाधान आहे. (dagdanchya desha saptarang marathi article by K c pande nashik news)

मा झ्या जीवनातील संपूर्ण वाटचालीत मला साईबाबांचा आशीर्वाद कायम लाभलेला आहे. त्यांचे दर्शन घेतल्यानंतर मिळणारी सकारात्मक ऊर्जा ही इतकी उत्साहवर्धक आहे, की तुम्ही कोणत्याही गोष्टीचा मनात निश्चय करा, ती गोष्ट निश्चित पूर्ण होईल. माझ्या जीवनात अशी अनेक उदाहरणे असतील, की त्या वेळी केवळ साईबाबांची भक्ती व त्यांचा आशीर्वादामुळेच मी स्वतःला सावरू शकलो व उभारी घेतली. साईबाबांच्या चरणी सेवा करण्याची मी एकही संधी व प्रसंग सोडत नव्हतो. एक कट्टर साईभक्त म्हणून मी सर्वश्रुत आहे. जगभरामध्ये माझे नाव झाले होते. अगदी आपल्या देशातही गल्लीपासून दिल्लीपर्यंत क्वचितच कोणी असेल, की जो मला ओळखत नाही. ही ओळख, हे शिखर मला फक्त गारगोटीमुळे बघावयास मिळाले होते. राजकारण, समाजकारण, वरिष्ठ सनदी अधिकारी, पत्रकारिता असे एकही क्षेत्र नाही, की जे मला गारगोटीमुळे ओळखत नव्हते.

तत्कालीन केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांना गारगोटी संग्रहालयाबद्दल माहिती देताना श्री. पांडे.
तत्कालीन केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांना गारगोटी संग्रहालयाबद्दल माहिती देताना श्री. पांडे. esakal

सर्व व्यवसायात उत्तरोत्तर प्रगती करत असताना साईबाबांविषयी मला काहीतरी करण्याची संधी मिळावी, अशी माझ्या मनात अंतःकरणापासून प्रेरणा होती व ती अनेकांजवळ बोलूनही दाखविली होती. दक्षणा, वर्गणी, सेवा हे सर्व करतातच; पण यापेक्षाही वेगळं शिर्डी संस्थानाचे नाव जगभर प्रसिद्ध तर होतेच. तेथे हजारो, लाखो भाविक रोज साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. येणाऱ्या साईभक्तांची सेवा करणे म्हणजे साईबाबांची सेवा, हे मला जाणवले. शिर्डी संस्थानसाठी काहीतरी केले पाहिजे, ही रुखरुख माझ्या मनात कायम होती.

तत्कालीन उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांच्याबरोबर के. सी. पांडे. शेजारी डी. पी. त्रिपाठी.
तत्कालीन उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांच्याबरोबर के. सी. पांडे. शेजारी डी. पी. त्रिपाठी. esakal

अशाच वेळी माझे परमस्नेही व राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते खासदार डी. पी. त्रिपाठी यांच्याशीही मी मनातली खंत बोलून दाखविली. त्यांनी मला सुचविले, की शिर्डी संस्थानांमध्ये तुम्ही काम करा. संस्थानचे विश्वस्त मंडळ जे सरकार नियुक्त असते, ते व प्रशासक मिळून संस्थानाचा कारभार चालवित असतात. येणाऱ्या भक्तांना व्यवस्थितरीत्या त्यांची राहण्याची, खाण्याची व्यवस्था व्हावी, साईबाबांचे लवकरात लवकर दर्शन व्हावे, शिर्डी संस्थानाच्या माध्यमातून लोकांसाठी विधायक अशा विकासाच्या योजना राबविणे इत्यादी प्रकारची कामे विश्वस्त व प्रशासक यांच्या माध्यमातून होतात.

K C Pande with Sharad Pawar
सोनेरी स्वप्नं : सोशल संन्यासाचा धनी

त्रिपाठींनी माझी भेट भारतीय राजकारणातील ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी घडवून आणली. गारगोटीच्या जगभर विस्तारामुळे शरद पवार मला ओळखत होते. त्यांनी गारगोटीची ख्यातीही ऐकलेली होती. त्यांच्या भेटीत त्यांनीही मला गारगोटी दगडांबद्दल अनेक प्रश्न विचारले व त्यांना कुतूहल वाटले, अशी दगडांची जादुई अद्‌भुत दुनिया आहे, हे ऐकून त्यांना नवलच वाटले. अत्यंत अभ्यासू, चिकित्सक, मितभाषी असलेले समाजकारणातील, राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व आपल्या गारगोटीबद्दल विचारपूस करीत आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटला. त्यांनी माझ्याकडून जगभरातला गारगोटीचा प्रवास, माझे सुरवातीचे दिवस हे सर्व शांतपणे ऐकून घेतले. सत्तेच्या केंद्रस्थानी असलेले शरद पवार यांनी मला नियोजित वेळेपेक्षा अधिक वेळ दिला. अनेक लोक बाहेर त्यांना भेटण्यासाठी ताटकळत उभी होती. पण मला अधिक वेळ देऊन ते म्हणाले, की ही गारगोटी आंतरराष्ट्रीय संग्रहालयाची स्थापना तुम्ही महाराष्ट्रात केली आहे, याचा आम्हाला

K C Pande with Sharad Pawar
अपने लिए जिओ ना...

सार्थ अभिमान आहे. तुमची साई भक्तीबद्दलची आस्था ही खरंच प्रशंसाजनक आहे. शिर्डी संस्थानच्या विश्वस्तपदासाठी मी तुमचे नाव सुचवितो, असे त्यांनी सांगितले आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला. २००४ मध्ये शासनाची शिर्डी संस्थानच्या विश्वस्तपदाची यादी जाहीर झाली आणि त्यामध्ये माझे नाव समाविष्ट होते. त्यावेळी शरद पवारांनी मला फोन करून सांगितले व माझे अभिनंदनही केले. यातून मला साईबाबांची सेवा करण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्यच समजतो.
( लेखक सिन्नरस्थित जगप्रसिद्ध गारगोटी संग्रहालयाचे प्रमुख आहेत.)

स्कोलेसाइट
स्कोलेसाइट esakal

स्कोलेसाइट
रासायनिक रचना
कॅल्शियम अॅल्युमिनियम सिलिकेट हायड्रेट
फायदे : स्कोलेसाइट हे उच्च कंपन क्रिस्टल्सपैकी एक आहे. जे खोल आंतरिक शांती आणि आध्यात्मिक परिवर्तन सुलभ करते. संप्रेषणासाठी, विशेषत: आत्म्याने मदत करण्यासाठी हा एक मजबूत दगड आहे. तुम्हाला शांत आणि आरामशीर वाटण्यासाठी हे एक अद्‌भुत क्रिस्टल आहे. तुमच्या उशाजवळ एक दगड ठेवा, कारण शांत झोपेसाठी हे खूप फायदेशीर आहे. हा एक दगड आहे, जो हृदयाला जागृत करतो. कारण त्याचा हृदयापासून वरच्या चक्रांमध्ये तीव्र अनुनाद असतो. एकदा तुम्ही ते वापरल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यात आणलेल्या अद्‌भुत भेटवस्तूंची प्रशंसा कराल. हे सुंदर स्फटिक तुम्हाला तुमच्या जीवनात हव्या असलेल्या गोष्टी आणण्यास मदत करते. कारण ते तुम्हाला तुमच्या जीवनमनावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.
ठिकाण : मालाड, मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com